Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे तीळ दर

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, ज्वारी आणि तीळ पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये आज सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत. मंगळवारच्या तुलनेत सोयाबीन, सोयापेंडचे भाव काहीसे वाढले होते. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे वाढून १०.६७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३४७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसातील चढ उतार कायम

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहिसे दर वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी दुपारपर्यंत वाढून होऊन वायदे ७३ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. तर देशातील वायदे ५८ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्याचे भाव आज स्थिर

कांद्याच्या कांद्याच्या भावावरील दबाव आजही कायम होता. कांद्याच्या दरातील चढ उतार कायम आहेत. ऐन खरिप बाजारात दाखल होण्याच्या तोंडावर दरातील तेजी कमी झाली आहे. भाव नरमल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आजही देशातील बाजारा कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ८०० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारीचा बाजार दबावातच

देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत. ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता खरिपातील ज्वारीही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे. दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

तिळाचे भाव नरमले

तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT