Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोच्या दरात सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत हिरवी मिरचीचे दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये काहिशी नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत. सोमवारच्या तुलनेत सोयाबीन, सोयापेंडचे भाव काहीसे कमी झाले होते. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन १०.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३४२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात चढ उतार

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहिशी नरमाई आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी दुपारपर्यंत वाढून होऊन वायदे ७२.९५ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. तर देशातील वायदे ५७ हजार ८०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदावरील दबाव कायम

कांद्याच्या भावावरील दबाव आजही कायम होता. देशातील काही भागात नव्या मालाची काही प्रमाणात आवक सुरु झाली. तर अफगाणिस्तानातून कांदा आयातीचीही बाजारात चर्चा आहे. याचा परिणाम कांद्याच्या बाजारावर दिसून आला. कांद्याला आज बाजारात ३ हजार ८०० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोच्या दरात सुधारणा

टोमॅटोची बाजारातील आवक घटली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठा फटका दिला. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली. मात्र दुसरीकडे टोमॅटोला उठाव कायम आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा दिसून आली. आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव दिसून आला. बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी दिला.

हिरवी मिरची टिकून

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव टिकून आहेत. बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहिशी वाढलेली दिसते. पण बाजारात मागणीही चांगली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे. बाजारात मिरचीचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT