Onion Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याच्या भावातील सुधारणा टिकून

Market Update : दोन दिवसांमध्ये कांदा भाव क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. कांद्याला आज सरासरी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

Anil Jadhao 

Market Bulletin : केंद्र सरकारने ५४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्यानंतर देशातील बाजारात कांदा भावात वाढ झाली. दोन दिवसांमध्ये कांदा भाव क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. कांद्याला आज सरासरी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

बाजारातील कांदा आवक दुसरीकडे टिकून आहे. पण यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक कमी होत जाण्याचा अंदाज आहे. तर कांद्याच्या  कांद्याच्या भावातील ही वाढ टिकून राहण्याचा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारत सोयाबीन  आणि सोयापेंडच्या दरावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव तीन वर्षातील निचांकी पातळीवर पोचले आहेत. तर देशातील सोयाबीन आजही दबावात आहे.

सोयाबीनचा भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकाले जात आहे. बाजारातील आवक टिकून आहे. त्यामुळे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस टिकून राहील, असा अंदाज सयोाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे. देशातील बाजारात कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे भावाला आधार मिळत आहे. कापसाची आवक १ लाख १२ हजार गाठींच्या दरम्यान झाली होती.

तर भावपातळी सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार सुरु आहेत. इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंज म्हणजेच आयसीईवर कापसाचे वायदे ९३.३८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. कापसाच्या भावात पुढील काळात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याचे भाव टिकून आहेत. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला. त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बाजारातील घटती आणि चांगला उठाव, यामुळे टोमॅटोच्या भावात सुधारणा झाली. टोमॅटोचे भाव मागील मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत. सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर सध्या तोडा सुरु असलेले प्लाॅटही कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT