Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापसाच्या भावात सुधारणा; कापूस, सोयाबीन, लसूण तसेच काय आहेत हळद दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हळद आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये पुन्हा नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.४७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३३९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यतेल आयातीचा दबाव आहे. त्यामुळे सोयाबीन मागील दोन महिन्यांपासून ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७५.०७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५९ हजार ८० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

राज्यात लसणाचे भाव तेजीत आहेत. बाजारातील लसणाची आवक खूपच कमी आहे. सरासरीपेक्षा आवक जवळपास ३० टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे व्यापारी सांगत आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात लसणाचा पुरवठा कमी आहे. पण दुसरीकडे लसणाची मागणी टिकून आहे. त्यामुळे लसणाचे भाव मागील काही महिन्यांपासूनच तेजीत आहेत. सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

मागच्या आठवडाभरात कांद्याच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. कांद्याचा भाव मागील आठवड्यातील उचांकी सरासरी भावपातळीपेक्षा काहीसा कमी झाला. तर बाजारातील कांद्याची आवक कमी होताना दिसत आहे. पण कांद्याचा सरासरी भाव आज २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होता. कांद्याची आवक यापुढच्या काळातही मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कांद्याच्या भावाला चांगला आधार राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीचे भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत. हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे. यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT