Maize Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Maize Market Update : मक्याचा बाजार कसा राहील?

जागतिक मका उत्पादन यंदा कमी राहील. तर अमेरिकेतील उत्पादनही घटलं, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय. सीबाॅटवर मागील काही दिवसांपासून मक्याचा दर एक भावपातळीभोवती फिरतोय. तर देशात मका पिकाला पावसाचा फटका बसतोय. त्यामुळं मका उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

टीम ॲग्रोवन

सोयाबीन दर टिकून

1. सध्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पिकाचं नुकसान वाढलंय. पीक नुकसान वाढण्याची शक्यता असल्यानं मध्य प्रदेशात सोयाबीन दरात काहीशी वाढ झालीये. सप्टेंबर महिन्यात सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० रुपये दर मिळत होता. मात्र सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर जूनं सोयाबीन सरासरी ५ हजार रुपयांनी विकलं जातंय. यंदा सोयाबीनला किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन बाजार अभ्यासकांनी केलंय.

कांदा दरात सुधारणा

2. कांदा दरात मागील काही दिवसांपासून सुधारणा झाली. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा आवकेतही घट दिसतेय. तसचं राज्यात इतर बाजारांमधील कांदा आवक घटली. मात्र खरिपातील लागवडी घटल्याचा बाजारावर परिणाम झाल्याचं जाणकार सांगतात. सध्या कांद्याला सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपये दर मिळतोय. मात्र कांदा पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं या दरात केवळ बराबरीच होतेय असं शेतकऱ्यांनी सांगितलं. तर पुढील काळात कांदा दरात आणखी काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

लाल मिरची तेजीत

3. सध्या बाजारात लाल मिरचीची आवक घटलेली दिसतेय. सध्या सुरु असेलल्या पावसामुळं लाल मिरचीमध्ये ओलावा जास्त येतोय. तर नुकसानही वाढलंय. त्यामुळं बाजारातील विक्री कमी होत आहे. परिणामी लाल मिरचीला चांगला दर मिळतोय. दुसरीकडं सणांमुळं लाल मिरचीला मागणी वाढलेली दिसते. त्याचाही परिणाम दरावर झालाय. सध्या लाल मिरचीला प्रतिक्विंटल १३ हजार ते २५ हजार रुपये सरासरी दर मिळतोय. लाल मिरचीचा हा दर पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज लाल मिरची बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

कापूस दर स्थिर

4. उद्योगांनी यंदा देशातील कापूस उत्पादन वाढेल, असं म्हटलंय. मात्र पावसामुळं होणारं नुकसान उद्योगांनी गृहित धरलं नसल्याचं काही जाणकार सांगतात. पण सूत आणि कापडाला अद्यापही मागणी वाढली नसल्यानं सूतगिरण्यांकडून कापसाला अपेक्षेप्रमाणं उठाव मिळत नाहीये. त्यामुळं कापसाचे दरही सध्या दबावात आहेत. देशात सध्या कापसाला किमान ७ हजार तर कमाल १० हजार रुपये दर मिळतोय. यंदा कापसाला किमान सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.

मक्याचा बाजार कसा राहील?

5. देशात सध्या मक्याचे दर (Maize Rate) दबावात आलेत. अमेरिकेच्या कृषी विभागानं (USDA) नुकतेच प्रसिध्द केलेल्या आपल्या अहवालात जागतिक मका उत्पादन (Global Maize Production) यंदा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केलीये. अमेरिकेतील मका पिकाला यंदा दुष्काळाचा (America Maize Crop Damage) फटका बसतोय. अमेरिकेत मागील हंगामात ३८३ दशलक्ष टन मका उत्पादन झालं होतं. तर यंदा ३५३ दशलक्ष टन मका उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळं शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर मक्याचा भाव ६.९० ते ७ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान आहे. देशातही यंदा खरिपातील मका उत्पादन वाढेल, असा अंदाज केंद्रानं व्यक्त केलाय.

गेल्या हंगामात खरिपात २२६ लाख टन मका उत्पादन झालं होतं. तर यंदा २३२ लाख टनांचा अंदाज आहे. पण सध्या मका पिकाला पावसाचा चांगलाच फटका बसतोय. मका कणसं सध्या दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. त्यातच महत्वाच्या मका उत्पादक पट्ट्यात जोरदार पाऊस झाले आणि सध्याही पडत आहे. त्यामुळं देशातील मका उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडं पशुखाद्य उद्योगाकडून मक्याला उठाव कमी झालाय. सोयापेंड आणि तांदळाचे दर कमी असल्यानं वापर वाढला. परिणामी मक्याचे दर दबावात आले. सध्या मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपये दर मिळतोय. मक्याचा हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात?

India EU FTA: भारत-युरोपियन महासंघात मुक्त व्यापार करारावर चर्चा

Aaple Sarkar Portal: सात दाखले आता ‘आपले सरकार’वर मिळणार

Guava Farming: ‘सरदार पेरू’- शेतकऱ्यांचा विश्वासाचा साथी

Vegetable Cultivation: सांगलीत वाढत्या थंडीमुळे भाजीपाला लागवड थांबली

SCROLL FOR NEXT