Onion Rate : कांदा, लसूण उत्पादक तोट्यात

दिल्लीतील आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसूण व्यापारी असलेले प्रवीण कुमार धमिजा सांगतात की, घाऊक बाजारात मागच्या दोन महिन्यांपासून लसणाचा प्रतिकिलोचा दर १० ते १० रुपये होता. पण हा दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचाच आहे.
Onion Rate
Onion Rate Agrowon
Published on
Updated on

पुणेः यंदा उत्पादनात (Onion Production) वाढ झाल्याने लसूण आणि कांदा उत्पादक शेतकरी (Onion Producer Farmer) अडचणीत आल्याचं सांगितलं जातं. सध्या वाढलेलं उत्पादन, पण मागणीत घट, उत्पादन खर्चात वाढ, (Onion Production Cost) निर्यातीला (Onion Export) बसलेला चाप आणि सातत्याने पडणार पाऊस अशा सगळ्या गोष्टींमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या टोमॅटोचे दर (Tomato Rate) वाढले आहेत मात्र सर्वत्र पाऊस सुरू असल्याने टोमॅटोच्या पिकांचं नुकसान (Tomato Crop Damage) होण्याची शक्यता आहे.

Onion Rate
Onion Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करा

दिल्लीतील आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसूण व्यापारी असलेले प्रवीण कुमार धमिजा सांगतात की, घाऊक बाजारात मागच्या दोन महिन्यांपासून लसणाचा प्रतिकिलोचा दर १० ते १० रुपये होता. पण हा दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचाच आहे. कारण उत्पादनाचा खर्च, तो माल बाजारात पोहोचवेपर्यंतचा खर्च असं सगळं गणित बघता शेतकऱ्यांना ते परवडणार नाहीये.

मध्यप्रदेशातील लसूण उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती तर अत्यंत बिकट आहे. लसूण उत्पादनात मध्य प्रदेश आघाीडवर आहे. पण शेतकऱ्यांना बाजारातून निव्वळ उत्पादन खर्च मिळवणंही मुश्किल झालंय. त्यामुळे राज्य सरकारने इतर राज्यातील बाजारपेठ उपलब्ध करून द्याव्या असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

Onion Rate
Onion Rate : चाळीत साठवलेल्या कांद्याची ४० टक्क्यांवर सड

तसं बघायला गेलं तर दरवर्षी पावसाळ्यात आपल्याला कांदा लसणाचे दर वाढलेले दिसतात. कारण बाजारात नवं पीक आलेलं नसतं. मात्र जिथं सर्वात जास्त कांदा पिकतो अशा महाराष्ट्र राज्यातही जुना कांदा 9 ते 13 रुपये दराने विकला जातोय. यावर मुंबईस्थित कांदा निर्यातदार अजित शहा सांगतात की, पाच महिने साठवलेल्या या कांद्याची किंमत शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि ते भरून काढणं गरजेचं आहे.

शहा पुढं सांगतात की, रब्बीच्या हंगामातील कांद्याचा साठा करून ठेवलेला असतो. पण सध्या श्रीलंकेत आणि बांगलादेशात सुरू असलेल्या समस्यांमुळे निर्यात घटलीय, तर देशांतर्गत बाजारपेठेतही मागणी घटलीय, तसेच हुबळी पट्ट्यात कांद्याच्या पिकांचं नुकसानही झालेलं नाही. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कांद्याचे भाव स्थिर आहेत.

पावसाळ्यात, महाराष्ट्र राज्यातून देशभरात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पुरवला जातो. पिंपळगाव बसवंत एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची विक्री केली जाते. मात्र टोमॅटोचे दर 10 ते 12 रुपये प्रति किलो आहेत. आत्ता आवक कमी असल्यामुळे आठवडाभरात दर वाढले आहेत, असं नाशिकचे शेतकरी अरुण मोरे सांगतात. या ऑगस्टमध्ये पिंपळगाव बाजारपेठेत टोमॅटोची वार्षिक आवक 50% पेक्षा कमी होती.

पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी दिलीप दिघे सांगतात, मागच्या काही दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतंय. नाशिक भागात सततच्या पावसामुळे फुलांची गळती झाली आहे. मी गेल्या आठवड्यात पहिली फळतोडणी केली आणि मला किलोमागे 20 रुपये दर मिळाला. पण पुढच्या फळतोडणीसाठी जरी हा दर मिळाला तरी माझा उत्पादन खर्च भागणार नाहीये. यावर्षी तसं ही फुल गळतीमुळे प्रति एकरी उत्पादन घटणार आहेच. त्यामुळे नुकसान ठरलेलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com