Cotton Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton Rate : उत्तरेत कापसाला काय दर मिळतोय?

लागवडीच्या काळात पाण्याची टंचाई, माॅन्सूनची उशीरा सक्रियता, कीड-रोग आणि अतिपावसामुळं उत्तर भारतातील कापूस उत्पादनात यंदा घट आली. पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यांमधील कापूस पिकाला मोठा फटका बसला, असं सांगितलं जातं.

टीम ॲग्रोवन

खाद्यतेल आयात वाढली

1. देशात मागील काही महिन्यांपासून खाद्यतेल आयातीत मोठी वाढ झाली. यंदा जुलै महिन्यात १२ लाख टन खाद्यतेल आयात झाली. ऑगस्ट मध्ये जवळपास १४ लाख टन तर सप्टेंबर महिन्यात तब्बल १६ लाख टन खाद्यतेल भारतात आयात झालं. याचा देशातील सोयाबीन दरावर परिणाम होतोय. सरकारनं खाद्यतेल आयातीवरील शुल्क मोठ्या प्रमाणात घटवलंय. तर सोयाबीन तेल आणि सूर्यफुल तेलाची वर्षाला २० लाख टन आयात कोणत्याही शुल्काविना करण्यास परवानगी दिली. यामुळं खाद्यतेलाची आयात वाढली. सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात कपात केल्यास सोयाबीन दराला आधार मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

टोमॅटो आवक कमीच

2. राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोची आवक कमी झालीये. मागील आठवडाभरापासून काही भागांमध्ये पाऊस पडतोय. याचा फटका टोमॅटो पिकालाही बसतोय. परिणामी बाजारातील आवक कमी झाली. पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक बाजार समित्या वगळता टोमॅटो आवक नगण्य होतेय. त्यामुळं दरात तेजीत आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ७०० रुपये दर मिळतोय. टोमॅटोचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

तांदळाची निर्यात घटली

3. केंद्राने बिगर बासमती तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा फटका यंदा तांदूळ निर्यातीला बसणार आहे. यंदा २०० लाख टन तांदळाची निर्यात अपेक्षित होती. निर्यात शुल्कामुळे तांदळाची निर्यात १७५ लाख टनापर्यंतच स्थिरावण्याचा अंदाज आहे. केंद्राने निर्यातशुल्क वाढवल्यानं देशात बिगर बासमती तांदळाच्या दरवाढीलाही ब्रेक लागला. सध्या बिगर बासमती तांदळाला प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ८०० रुपये सरासरी दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

मुगाचे दर दबावात

4. देशात सध्या मुगाची टंचाई जाणवतेय. मात्र तरीही मुगाचे दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. यंदा देशात मुगाची लागवड जवळपास दीड टक्क्यांनी कमी होऊन ३८ लाख २१ हजार हेक्टरवर स्थिरावली. तसचं पिकाला पावसाचाही फटका बसला. त्यामुळं देशातील मूग उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. असं असतानाही देशातील बाजारात मुगाला सध्या सरासरी ६ हजार ३०० ते ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. मुगाचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगातून व्यक्त होतोय.

उत्तरेत कापसाला काय दर मिळतोय?

5. लागवडीच्या काळात पाण्याची टंचाई, माॅन्सूनची उशीरा सक्रियता, कीड-रोग आणि अतिपावसामुळं उत्तर भारतातील कापूस उत्पादनात (North East Cotton Production) यंदा घट आली. इंडियन काॅटन असोसिएशन लिमिटेडने (Indian Cotton Association Limited) यंदा पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यांमधील कापूस उत्पादन (Cotton Production) ५१ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज जाहीर केलाय. हंगामाच्या प्रारंभी उत्तरेतील या राज्यांमध्ये उत्पादन जवळपास २४ टक्क्यांनी वाढून ५८ लाख ३० हजार गाठींवर पोचेल, असं वाटतं होतं. मात्र पंजाब आणि हरियानात मागील महिनाभरात अनेक भागांमध्ये पावसाचा चांगलाच दणका दिलाय.

काही भागातील पीकं पाण्याखालीही गेली होती. तसंच पांढरी माशी आणि गुलाबी बोंडअळीचाही प्रादुर्भाव झाला. राजस्थानमध्येही काही भागांमध्ये हीच परिस्थिती होती. त्यामुळं कापूस उत्पादन यंदा घटणार, असं शेतकरी मागील महिन्यातच सांगत होते.उत्तर भारतात कापूस उत्पादन घटल्याचं स्पष्ट झाल्यानं दरातही वाढ होऊ शकते, असं येथील उद्योग आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं. सध्या पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये किमान ७ हजार ते कमाल ९ हजार ५०० रुपये सरासरी दर मिळतोय. तर इतर राज्यांतील दर हे ७ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. शेतकऱ्यांना यंदा सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्रीचं नियोजन करावं, असं आवाहन जाणकारांनी व्यक्त केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT