Tur Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : देशातील बाजारात तुरीची आवक कशी सुरु आहे?

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाचे भाव आजही स्थिर होते. कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. तर बाजारातील आवकही कायम दिसते. आजही देशातील बाजारात जवळपास १ लाख ७० हजार गाठींच्या दरम्यान आवक झाली होती. तर कापसाची भावपातळी सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते.

गुजरात, महाराष्ट्र, उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील आवक चांगली आहे. आवकेचा दबाव असल्याचाही परिणाम भावावर दिसून येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव दबावात आहेत. यामुळेही देशातील भावपातळी स्थिरावलेली दिसते. ही स्थिती आणखी एक ते दीड महिना राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनच्या भावावरील दबाव आजही कायम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कालपासून भावापतळी एकाच दरावर दिसते. आज दुपारपर्यंत १२.७४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयाडाॅलरचे वायदे ३८० डाॅलरवर होते. देशातील बाजारातही भावपातळी कायम आहे.

प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीनचे भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. सोयाबीन बाजारातील आवक ३ लाख ४० हजार पोत्यांच्या दरम्यान होती. सोयाीबनच्या बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात मागील तुरीचे भाव सध्या दबावात आले आहेत. नवा माल बाजारात दाखल होत असून आवक हळूहळू वाढत आहे. जानेवारीत आवकेचा दबाव आणखी वाढू शकतो, असा अंदाज आहे. आज कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बहुतेक बाजारांमध्ये तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

तर यंदा सरकारने तुरीसाठी ७ हजारांचा हमीभाव जाहीर केला. आवक वाढल्यानंतर बाजारावर दबाव वाढू शकतो. पण सरकारही यंदा बाजारभावाने तुरीची खरेदी करणार आहे. त्यामुळे तूर बाजाराला आधार मिळेल. त्यामुळे तुरीच्या भावात फार मोठी घट होण्याची शक्यता नाही, असा तूर बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

बाजारातील आल्याची आवक सध्या मर्यादीत आहे. आल्याला मागणीही चांगली आहे. त्यामुळे आल्याचा बाजारात स्थिरावलेला दिसतो. आल्याचे भाव आपल्या उच्चांकावरून कमी झाले. मा सध्याचे भाव मागीलवर्षीच्या तुलनेत जास्तच आहेत. सध्या आले सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे.

पुढील काळात लग्न समारंभामुळे आल्याला मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यातच यंदाही आले उत्पादनाविषयीची चिंता कायम आहे. उत्पादन यंदाही कमीच राहू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून राहतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सध्या बाजारातील पपईची आवक चांगली आहे. त्यामुळे पपईच्या बाजारावर दबाव दिसून येत आहे. राज्याच्या विविध भागातून पपईची काढणी सुरु असून आवक सरासरीपेक्षा जास्त दिसते. दुसरीकडे पपईला उठावही मिळत आहे. पण आवकेचा दरावर दबाव असून सरासरी ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव पपईला राज्यात मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पुढील काही दिवसांमध्ये पापईची आवक राज्याच्या अनेक भागातून कमी होत जाईल. उन्हाचा चटका वाढल्यानंतर पपईला उठाव चांगला राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पपईचा बाजारही सुधारु शकतो, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT