Amravati APMC Update: यंदाच्या हंगामातील नव्या सोयाबीनची बाजारातील आवक अद्याप कमी असतानाच दराने सहा हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. अमरावती बाजार समितीत नव्या सोयाबीनला कमाल सहा रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ५७०८ रुपये हमीभावापेक्षा हा दर २९२ रुपयांनी अधिक आहे..यंदा पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक भागांत प्रतिकूल हवामानामुळे उत्पादकता घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील बाजारात येणारा मालही तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये नव्या सोयाबीनची आवक मर्यादित असल्याने उपलब्धतेच्या तुलनेत मागणी चांगली राहून दराला आधार मिळत आहे..Akola Soybean Yield Zero: सोयाबीनचे अल्प उत्पादन.बाजारातील सध्याचा दर हा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा असला तरी उत्पादनातील घट लक्षात घेता प्रति एकर मिळणारे उत्पन्न किती राहते, यावर सोयाबीनचा हंगाम फायदेशीर ठरणार की नाही, हे ठरणार आहे. यंदाच्या हंगामात जूनमध्ये पावसाला विलंब झाला. त्यानंतर जुलैमध्ये पावसाने काही काळ समाधानकारक हजेरी लावली; मात्र पुढे पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन पिकाला फटका बसला. काही ठिकाणी हलक्या जमिनीतील सोयाबीनची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला सध्या मागणी आहे..Soybean Farmers Issue: सोयाबीन सोंगावे की गुरांना टाकावे?.सध्या सोयाबीनची काढणी सुरू झाली असून बाजार समित्यांमध्ये आवक जेमतेम आहे. काही शेतकरी दराचा अंदाज घेत माल विक्रीसाठी आणत आहेत, तर काही शेतकरी दर आणखी वाढण्याच्या अपेक्षेने विक्री थांबवत आहेत. पितृपक्ष संपल्यानंतर बाजारातील आवक वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर दराची खरी दिशा स्पष्ट होईल, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात..प्लांटची खरेदी पुढील आठवड्यात सुरूजिल्ह्यातील काही प्रक्रिया उद्योजकांची (प्लांट) खरेदी सध्या बंद असली तरी स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी सुरू आहे. त्यामुळे सध्याचे बाजारभाव हमीभावाच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक राहण्याची स्थिती आहे. पुढील आठवड्यात प्लांटची खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारातील मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.