Maharashtra Weather Forecast: कोकणात उष्ण, दमट हवामान शक्य
IMD Weather Update: आज (ता. ६) दक्षिण कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूरचा घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.