Agriculture Market Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: आल्याच्या दरात सुधारणा, केळी तेजीत; आवळा-कापूस दर स्थिर, कोबीची आवक कायम

Daily Commodity Rates: आज आपण कापूस, कोबी, केळी, आवळा आणि आले बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

आले दरात सुधारणा

मागील आठवडाभरात आल्याच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली. आनेक भागातील पावसामुळे आल्याची बाजारातील आवक कमी काहीशी कमी झाली. तसेच लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे आल्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. आल्याचे भाव आता सरासरी ३ हजार ५०० रुपये ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान होते. आल्याची बाजारातील मागणी पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आल्याच्या दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आवळा दर टिकून

बाजारातील आवळ्याची आवक पावसामुळे कमी झाली आहे. बाजारात आवळ्याला उठाव मात्र चांगला आहे. अनेक भागात पावसाचा आवळा पिकाला फटका बसला. त्यामुळे बाजारातील आवकेवर परिणाम होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारात आवळ्याला सरासरी ४ हजार ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. आवळ्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवळ्याच्या भातही काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

केळीचे दर तेजीत

केळीला बाजारात सध्या चांगला दर मिळत आहे. बाजारातील केळीला चांगला उठाव आहे. मात्र बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे केळीचे दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात केळी ३० रुपये ते ७० रुपये प्रतिडझन मिळत आहे. तर घाऊक बाजारात सध्या केळीला १८०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. पुढील काळात केळीची आवक काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील जाणकार व्यापारी व्यक्त करत आहेत. 

कोबीची आवक कायम

बाजारात कोबीची आवक कायम आहे. पावसामुळे अनेक भागात कोबी पिकाचे उत्पादन कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे कोबी पिकाचे भाव टिकून आहेत. कोबीला सध्या बाजारात उठावही चांगला आहे. त्यामुळे कोबीला सध्या सरासरी प्रतिक्विंटल १८०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काही दिवस बाजारात कोबीची आवक मर्यादीतच राहण्याची आहे. त्यामुळे कोबीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारात व्यापारी व्यक्त करत आहेत. 

कापूस दर स्थिर

कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. सध्या बाजारात १५ हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक सुरु आहे. तर सीसीआय देखील कापसाची विक्री करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव ६८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत. कच्च्या तेलाच्या भावातील चढ उतारासोबत कापसाच्या भावातही काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. देशात सध्या कापूस ७ हजार ४०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कापसाची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम दरावर दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT