Agricultural Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: आल्याच्या दरात चढ उतार; कांदा, ज्वारी, तीळ तसेच काय आहेत हरभरा भाव?

Daily Commodity Rates: आज आपण कांदा, ज्वारी, आले, चिंच आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

कांदा भाव दबावातच

बाजारातील कांद्याची आवक चांगली सुरु आहे. काही बाजारांमध्ये अवकाळी पावसामुळे आवकेवर परिणाम दिसत आहे. मात्र पुढे कांद्याला उठाव सरासरीच आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत. कांद्याला सरासरी बाजारात सरासरी ९०० ते ११०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. बाजारातील कांद्याची आवक मे महिन्यात काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारीचा भाव स्थिर

ज्वारीचे दर मागील दीड महिन्यात क्विंटलमागे किमान ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारातील ज्वारीची आवक वाढत आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये ज्वारीची आवक चांगली आहे. तर दुसरीकडे सध्या ज्वारीला सरासरी दर मिळत आहे. सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे २३०० ते ३१०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. बाजारातील ज्वारीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्वारीच्या दरावरही दबाव दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

आल्याच्या दरात चढ उतार

बाजारातील आल्याची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी दिसत आहे. तर दुसरीकडे लग्नसराईमुळे आल्याला उठाव आहे. याचा आधार आल्याच्या भावाला मिळत आहे. मागील दोन आठवड्यांपासून आल्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. आल्याचे भाव सध्या ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. सध्या आल्याला उठाव आहे. तसेच पुढील काळात बाजारातील आवकही कमी होणार आहे. त्यामुळे आल्याच्या भावात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तिळाचे दर टिकून

बाजारातील वाढत्या आवकेबरबोर तिळाच्या भावातही नरमाई दिसून आली. तिळाला देशातील बहुतांशी बाजारात चांगला उठाव आहे. असे असतानाही आवकेच्या दबावाबरोबर दरावरही दबाव दिसून येत आहे. बाजारात सध्या तिळाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत. बाजारातील तिळाची आवक पुढील काही आवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात सुधारणाही होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

चिंचेला उठाव

बाजारातील चिंचेची आवक मात्र मर्यादीत दिसत आहे. तर चिंचेला बाजारात सध्या मागणी दिसून येत आहे. चिंच उत्पादनाला यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे चिंचेला सध्या ९ हजार ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. चिंचेची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर बाजारातील आवक कमी होत जाईल. त्यानंतर दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT