Cotton Farming Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे वाढले

Market Update : कापसाच्या वायद्यांनी उचांकी ८७ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा पार केला. तर देशातील वायदेही वाढून ५८ हजार प्रतिखंडीवर पोचले.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी चांगलीच वाढ झाली होती. इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंजवर कापसाचे वायदे मागील ४ महिन्यांतील उचांकी पातळीवर पोचले. कापसाच्या वायद्यांनी उचांकी ८७ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा पार केला. तर देशातील वायदेही वाढून ५८ हजार प्रतिखंडीवर पोचले.

बाजार समित्यांमध्ये मात्र आवकेचा दबाव कायम आहे. कापसाची आवक १ लाख ७० हजार गाठींच्या दरम्यान होती. तर भावपातळी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती. कापसाचे वायदे आणि बाजार समित्यांमध्ये पुढील काळात सुधारणा होण्याची शक्यता आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. सध्या बाजारातील जास्त आवक, मोहरी उत्पादनात वाढीचा अंदाज आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे कमी झालेले भाव याचा दबाव देशातील सोयाबीन दरावर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात निराशेचे वातावरण असल्याने भावावरील दबाव कायम आहे.

देशातील बाजारात सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर देशातील बाजारात आवेकचा दबाव आणि मोहरी उत्पादनाची स्थिती स्पष्ट होईपर्यंत दरपातळीवर दबावच राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये वाढले आहेत. यंदाच्या हंगामातील घटलेली लागवड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता यामुळे हरभरा भाव वाढले आहेत. त्यातच सरकारकडील स्टाॅकही कमी होत आहे. त्यामुळे हरभऱ्याचा भाव सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पोचला.

सरकार निवडणुका होईपर्यंत हरभरा दबावातच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हरभरा भाव जास्त कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. निवडणुकांनंतर हरभरा बाजारात सुधारणाही दिसू शकते, असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

टोमॅटोचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत काही बाजारात सुधारलेले दिसतात. तर काही बाजारांमध्ये आवक जास्त असल्याने भावपातळी आजही कायम होती. राज्यातील अनेक बाजारांमध्ये टोमॅटोची आवक कमी झालेली दिसते. सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोचे भाव वाढले आहेत.

सध्या टोमॅटोला सरासरी १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी असून पुढील काळातही ही स्थिती कायम राहू शकते, त्यामुळे बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला. त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT