Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस दबावातच; कापूस, सोयाबीन, टोमॅटो, तसेच काय आहेत मका दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, गवार आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. पण कालच्या तुलनेत आज सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे काही प्रमाणता सुधारले होते. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.९१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आले होते. तर सोयापेंडचे वायदे ३६० डाॅलरवर होते. देशातील बाजारात मात्र भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम आहे. सोयाबीनच्या बाजारात आणखी काही दिवस ही स्थिती राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढ उतार आजही कायम होते. आंतरराष्ट्रीयबाजारातील वायदे ७४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५७ हजार ६० रुपये प्रतिखंडीवर होते. देशातील बाजारातील आवक कायम आहे. तसेच मागणीची स्थितीही जैसे थे आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील भावपातळीही ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. कापसाच्या भावातील चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या भावात सुधारणा कायम आहे. बाजारातील दरपातळी वाढीच्या दिशेने दिसत आहे. राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक आजही सरासरीपेक्षा घटली आहे. दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव सरासरी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. यापुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव सुधारतील, असाही अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

गवारच्या भावातील तेजी आजही टिकून आहे. बाजारातील कमी आवक आणि चांगल्या उठावामुळे भाव तेजीत आहेत. इतर भाजीपाल्याच्या भावातील सुधारणेचाही फायदा गवारला मिळत आहे, असे व्यापारी सांगत आहेत. गवारचा भाव सध्या ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. गवारची आवक पुढील काही आठवडे कमी जास्त राहू शकते, पण गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

गव्हाचे देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारत आहेत. देशाच्या अनेक भागात पाऊस सुरु झाल्याने बाजारातील आवक कमी झाली. दुसरीकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे. बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

NASAKA Sugar Factory : थकीत देण्यांवरून नासाका प्रशासनाच्या रडारवर

Rain Update: कडाक्याच्या उन्हानंतर पहाटेच्या पावसाने दिलासा

Gazette Mismatch : गॅझेटमधील नावे वेगळी, दगड वेगळ्याच ठिकाणी

SCROLL FOR NEXT