Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दबावातच; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत तूरीचे दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, गहू आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार कायम आहेत. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात ७५ सेंटपेक्षा कमीच आहेत. मागील काही दिवसांपासून वायद्यांनी ही दरपातळीही गाठली नाही. आज दुपारी ७२.१२ सेंटवर होते. देशातील वायदेही ५६ हजार १२० रुपयांपर्यंत कमी झाले होते. बाजार समित्यांमध्ये भावपातली ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत काहीशी वाढ झाली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.८५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६० डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात आज काहीशी नरमाई दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीनचे भाव ४ हजार ६७५ रुपये प्रतिक्विंटलवर काढले. तर बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

कांद्याच्या भावात आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली. बाजारात कांद्याचा वाढलेला पुरवठा आणि ग्राहक पेठांमध्ये वाढलेल्या भावात कांद्याला कमी झालेला उठाव, याचा परिणाम कांदा भावावर दिसून येत आहे. सध्या कांद्याचा सरासरी भाव २००० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये पाऊस सुरु झाल्याने कांद्याची आवक कमी झाली होती. यापुढच्या काळातही कांदा आवकेनुसार बाजारात बदल होऊ शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीचा भाव देशातील बाजारात टिकून आहे. तुरीला सध्या चांगला उठाव येत असल्याने मागील आठवड्यापासून दरात काहीशी वाढ झाली आहे. आयात तुरीचे भावही जास्तच असल्याने देशातील बाजाराला चांगला आधार आहे. भाजीपाला महाग झाल्याने डाळीला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे तुरीला आधार मिळत आहे. परिणामी तुरीचा बाजारात मागील काही महिन्यांपासून ११ हजार ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

गव्हाचे देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारत आहेत. देशाच्या अनेक भागात पाऊस सुरु झाल्याने बाजारातील आवक कमी झाली. दुसरीकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे. बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT