Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस भाव दबावातच ; कापूस, सोयाबीन, तूर तसेच ज्वारी दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील कापसाचे वायदे शुक्रवारी काही प्रमाणात कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ७१.१० सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ५६ हजार २४० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी काही ठिकाणी आज काहीशी नरमली होती. पण सरासरी भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांवर होती. कापूस बाजारतील चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई दिसून आली होती. सोयाबीनचे वायदे ११.७८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडचे वायदे ३६७ डाॅलरवर होते. देशात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते. सोयाबीनचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत. रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीच्या भावावर दबाव आला होता. ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर उत्पादकता कमी राहील्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण बाजारातील आवक वाढल्याने २ हजार ३०० ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीवरीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात. त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 

तुरीचा भाव देशातील बाजारात टिकून आहे. तुरीला सध्या चांगला उठाव येत असल्याने मागील आठवड्यापासून दरात काहीशी वाढ झाली आहे. आयात तुरीचे भावही जास्तच असल्याने देशातील बाजाराला चांगला आधार आहे. भाजीपाला महाग झाल्याने डाळीला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे तुरीला आधार मिळत आहे. परिणामी तुरीचा बाजारात मागील काही महिन्यांपासून ११ हजार ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

गव्हाचे देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारत आहेत. देशाच्या अनेक भागात पाऊस सुरु झाल्याने बाजारातील आवक कमी झाली. दुसरीकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे. बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT