cotton rate
cotton rate  agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton Rate : कापूस दरातील तेजी परतणार?

टीम ॲग्रोवन

ब्राझीलनं मका रोखल्याने दरात सुधारणा

जगात अमेरिका आणि चीननंतर मका उत्पादनात ब्राझीलचा नंबर लागतो. ब्राझीलमधील उत्पादन आणि साठ्याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम होतो. सध्या ब्राझीलमध्ये मक्याचा मोठा साठा आहे. ब्राझीलमधील मक्याचा साठा सध्या ४३० लाख टनांपर्यंत पोचलाय. मागीलवर्षी याच काळातील साठा ११० लाख टनांवर होता. ब्राझीलनं साठा मागं ठेवल्यानं मक्याच्या तेजीला आधार मिळाल्याचं जाणकारांनी सांगितलंय. शुक्रवारी मक्याचे वायदे एक टक्क्याने वाढून ६.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर देशातही मक्याचा भाव २२०० ते २६०० रुपयांच्या दरम्यान राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याची टंचाई असल्यानं दर कायम राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

बाजारात गहू आवक वाढल्यानं दर स्थिरावले

मागील काही आठवड्यापासून देशातील बाजारांमध्ये गव्हाची आवक कमी होती. त्यामुळं दरात वाढ होऊन, दर २१०० ते २५०० रुपयांपर्यंत पोचले. मात्र मागील काही दिवसांमध्ये अचानक मध्य प्रेदश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील बाजारांमध्ये गव्हाची आवक वाढतेय. या वाढलेल्या दरात व्यापारी नफा वसुली करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणकार सांगत आहेत. पण बाजारात आवक वाढल्यानं दरातील वाढ थांबलीये. बाजारातील आवक वाढल्यास गव्हाचे दर एक ते दोन टक्क्यांनी नरमतील, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.

काबुली हरभऱ्याचे दर सुधारण्याची शक्यता

जगभरात काबुली हरभऱ्याला चांगली मागणी असते. भारतात याचे उत्पादन कमी होतं. त्यामुळं आयात करून गरज भागविली जाते. भारतात मागील हंगामात केवळ अडीच लाख टन काबुली हरभरा उत्पादन झालं होतं. त्यामुळं सध्या या हरभऱ्याची टंचाई जाणवतेय. परिणामी काबुली हरभऱ्याचे दर सुधारले. सध्या देशात काबुली हरभऱ्याला सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये दर मिळतोय. तर आयात काबुली हरभराही १० हजार ते ११ हजाराने विकला जातोय. पुढील काळात काबुली हरभरा पुरवठा कमी राहून दर कायम राहतील किंवा एक ते तीन टक्क्यांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

निर्यात वाढल्यास साखरेचे दर वाढण्याचा अंदाज

साखर उद्योगाकडून सातत्यानं साखर निर्यातीला परवानगी देण्याची मागणी होत होती. त्यामुळं केंद्रानं ७ लाख ७७ हजार टन साखरेला निर्यातीची परवानगी दिलीये. मात्र कारखान्यांनी यापेक्षा अधिक साखर निर्यातीची मागणी केली होती. देशातील साखरेचे दर सुधारलेले आहेत. सध्या साखरेला किरकोळ बाजारात ३६ ते ३९ रुपये प्रतिकिलोचा दर मिळतोय. देशातून साखर निर्यात वाढल्यास किरकोळ साखरेचे दर २ ते ३ रुपयांनी वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळं साखर निर्यातीला परवानगी देताना सरकार देशातील दराचा अंदाज घेत असल्याचं उद्योगानं म्हटलंय.

कापूस दरातील तेजी परतणार?

मागील हंगामात कापसाला चांगला दर (Cotton Rate) मिळाला होता. देशातील कापूस उत्पादन (Cotton Production) २० टक्क्यांनी कमी झालं होतं, मात्र वापर ३० टक्क्यांनी अधिक राहिला. त्यामुळं कापसाच्या दरात तेजी (Boom In Cotton Rate) होती. शेतकऱ्यांनाही ८ हजार ते ९ हजार रुपये दर मिळाला. त्यामुळं यंदा कापूस लागवड (Cotton Cultivation) १५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र सध्या कापसातील तेजी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दर (Cotton Rate In Global Market) कमी झाले. त्यामुळं सुरुवातीच्या काळात असेलेली कापूस लागवडीतील वाढ सध्या कमी झाली.

देशात ५ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार जवळपास ७ टक्क्यांनी कापूस लागवड अधिक आहे. आतापर्यंत १२१ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली. गेल्यावर्षी याच काळात ११३ लाख हेक्टर क्षेत्र कापसाखाली होतं. त्यातच महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाना आणि पंजाब महत्वाच्या कापूस राज्यांमध्ये जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत पिकाचं नुकसान झालं. त्यामुळं कापूस लागवड क्षेत्रातील वाढ नंतरच्या अहवालात कमी येण्याची शक्यता व्यक्त होतेय. तसंच पावसामुळं पिकावर कडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. महाराष्ट्र, हरियाना आणि तेलंगणात गुलाबी बोंडअळी आल्याचं वृत्त आहे. याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. तसंच अमेरिका आणि इतर काही देशांमध्येही वातावरणाचा फटका पिकाला बसतोय. या सर्व कारणामुळं पुन्हा कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळतेय. सीबाॅटवर कापसाचे वायदे दीड टक्क्याने सुधारून ९६.०७ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले. तर देशातील वायद्यांमध्येही कापूस सुधारलाय. एससीएक्सवर कापसाचे वायदे जवळपास एक टक्क्याने वाढून ४७ हजार १८० रुपये प्रतिगाठीवर बंद झाले. कापूस उत्पादनाची स्थिती पाहता हे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT