Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस वायदे पुन्हा नरमले; कापूस, सोयाबीन , कांदा तसेच तूरीचे दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, गहू आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये पुन्हा एकदा नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा साडेतील वर्षातील निचांकी पातळीवर पोचले होते. कापूस वायद्यांनी काल ७१.३६ सेंटचा टप्पा गाठला होता. तर आज दुपारी ७२.३५ सेंटवर होते. देशातील वायदेही ५६ हजार १०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. बाजार समित्यांमध्ये भावपातली ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनचा बाजार देशात दबावातच आहे. नव्या हंगामातील लागवडी सुरु झाल्या तरी सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकावे लागत आहे. सोयाबीनचा बाजार सध्या ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ११.८४ डाॅलरवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात विविध घटकांचा भावावर परिणाम दिसून येत आहे. खाद्यतेलाच्या भावावरही दबाव आहे. त्यामुळे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीच्या भावात मागील काही दिवसांपासून आणखी सुधारणा झाली. आयात तुरीचे भावही जास्तच असल्याने देशातील बाजाराला चांगला आधार आहे. भाजीपाला महाग झाल्याने डाळीला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे तुरीला आधार मिळत आहे. परिणामी तुरीचा बाजारात मागील काही महिन्यांपासून ११ हजार ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

गव्हाचे देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारत आहेत. देशाच्या अनेक भागात पाऊस सुरु झाल्याने बाजारातील आवक कमी झाली. दुसरीकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे. बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्याच्या भावातील सुधारणा आजही कायम आहे. देशातील बाजारात बहुतांशी ठिकाणी कांद्याची दरपातळी २ हजारांच्या पुढे सरकली आहे. सध्या कांद्याचा सरासरी भाव २२०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे. तर काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशाने थांबले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT