Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस वायदे दबावातच; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत तूर दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनचे वायदे दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी नरमाई आली होती. सोयाबीनचे शुक्रवारी १०.९८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३०७ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीनवरील दबाव कायम आहे. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ५००  ते ४ हजार ६८० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमधील भाव ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचे भाव स्थिर

कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ७०.७७ सेंट प्रतिपाउंडच्या दरम्यान होते. देशातही वायदे दबावातच आहेत. मात्र शुक्रवारी बाजार काहीसा सुधारून बंद झाला होता. जुलैचा वायदा शुक्रवारी ५६ हजार ५४० रुपयांपर्यंत होता. बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ७ हजार १०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हरभऱ्याचा उठाव टिकून

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव काहीसे स्थिरावले आहेत. सरकारने हरभऱ्यावर स्टाॅक लिमिट लावल्यानंतर भावात काहीसे चढ उतार सुरु होते. पण मागणी टिकून असल्याने भाव पुन्हा टिकून आहेत. बाजारातील हरभरा आवकही सध्या मर्यादीत आहे. त्यामुळे हरभरा आजही सरासरी ६ हजार ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. देशात सध्या हरभऱ्याची उपलब्धता कमी असल्याने यापुढच्या काळातही हरभरा भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

तुरीची भावपातळी कायम

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याची आवक कमीच

कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे. कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पुर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे. बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली. पण कांद्याचा उठाव कायम आहे. त्यामुळे कांद्याला आज सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT