Onion Market : पंधरा दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर

Onion Rate : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचा दर प्रतिक्विंटल ६०० रुपयांपासून तीन हजारापर्यंत स्थिर आहे.
Onion Market
Onion Market Agrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यात दररोज नगरसह जिल्ह्यातील बाजार समितीत प्रत्येक लिलावाला साधारणपणे दीड ते पावणे दोन लाख कांदा गोण्यांची आवक होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचा दर प्रतिक्विंटल ६०० रुपयांपासून तीन हजारापर्यंत स्थिर आहे.

जिल्ह्यात कांद्याची बऱ्यापैकी आवक होत आहेत. नगर बाजार समितीत एक नंबर कांद्याला २३०० ते ३०००, दोन नंबर कांद्याला १६०० ते २३००, तीन नंबर कांद्याला १००० ते १६००, चार नंबर कांद्याला ६०० ते १००० रुपये भाव मिळाला.

Onion Market
Onion Production: गादीवाफ्यावरील कांदा लागवड तंत्र

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. १८) एकूण १४ हजार २५४ कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला तीन हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. प्रतवारीनुसार एक नंबर कांदा २६०५ ते ३१००, दोन नंबर कांदा २००५ ते २६००, तीन नंबर कांदा ३०० ते २००० आणि गोल्टी कांद्यास १८०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. शेतकऱ्यांनी प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले.

Onion Market
Onion Market : ‘एनसीसीएफ’ कांदा खरेदीचे शेतकऱ्यांना पैसे मिळेनात

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील बाजार समितीत ६४ हजार ५५६ कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला तीन हजार रुपयांचा दर मिळाला. मोठ्या कांद्याला २७०० ते ३०००, गोल्टी कांद्याला २३०० ते २६०० रुपयापर्यंत दर मिळाला.

पारनेर येथील बाजार समितीत १६ हजार ७१५ कांदा गोण्यांची आवक झाली. या ठिकाणी एक नंबर कांद्याला २८०० ते ३०००, दोन नंबर कांद्याला २४०० ते २७००, तीन नंबर कांद्याला १६०० ते २३००, चार नंबर कांद्याला १००० ते १५०० रुपयांचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com