Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा झाली होती. पण सोयाबीन आणि सोयापेंडचा भाव ४ वर्षातील निचांकी पातळीवरच होता. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३११ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीनवरील दबाव कायम आहे. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ५०० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमधील भाव ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या कापसाला अपेक्षेप्रमाणे उठाव नाही. त्याचा परिणाम कापसाच्या भावावर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत ७१.८१ सेंट प्रतिपाउंडच्या दरम्यान होते. तर देशातही वायदे दबावातच असून जुलैचा वायदा आज दुपारपर्यंत ५६ हजार ६६० रुपयांपर्यंत खाली आला होता. बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ७ हजार १०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
टोमॅटोचे भावही आजही टिकून आहेत. बाजारातील टोमॅटोची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. पण दुसरीकडे बाजारात टोमॅटोला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटोचा बाजार सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत.
कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे. कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पुर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे. बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली. पण कांद्याचा उठाव कायम आहे. त्यामुळे कांद्याला आज सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
आल्याचे काहीसे टिकून असल्याचे दिसून येत आहे. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.