Chana Market
Chana Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हरभऱ्याच्या दरातील वाढ कायम

अनिल जाधव

सोयाबीन भावातील चढ उतार काही थांबायचे नाव घेईना. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत ११.६६ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ३४६ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनचा भाव कमी जास्त होताना दिसत आहे.

प्रक्रिया प्लांट्सचे भाव आजही प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ७५० ते ४ हजार ८५० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान कायम होते. सोयाबीन बाजारातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाच्या बाजारात मागील दोन दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली. वायद्यांमध्ये कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ८२.९२ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत पोचले होते. तर देशातील वायदे ५९ हजार २०० रुपयांपर्यंत वाढले होते.

देशातील बाजारात कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे बाजार समित्यांमध्येही कापूस भाव काहीसे वाढले आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. कापूस दरात पुढील पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बाजारात सध्या हिरवी मिरची चांगलाच भाव खात आहे. बाजारातील मिरचीची आवक गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी झाली. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. त्यामुळे मिरचीचे भाव तेजीत आहेत. सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव मिरचीची गुणवत्ता आणि व्हरायटीनुसार मिळत आहे. हिरव्या मिरचीचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभऱ्याच्या भावातील वाढ कायम आहे. बाजारातील कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे हरभऱ्याला सध्या चांगला भाव आहे. यंदा उत्पादन घटल्याने बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.

ऐन आवकेच्या हंगामातही आवक सरासरी गाठत नसल्याने भाववाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ५०० ते ५ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर हरभऱ्याचा हा भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीची भावपातळी कायम आहे. हळधीचे भाव वाढण्याला प्रामुख्याने यंदाचे घटलेले उत्पादन हे महत्वाचे कारण आहे. यंदा पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे हळद लागवड कमी झाली होती. बाजारतील हळदीची आवक गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेली आहे.

त्यामुळे हळदीच्या भावात काहीशी नरमाई आली खरी पण अनेक बाजारात पुन्हा काहीशी सुधारणा झाली. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. हळद बाजारातील सुधारणा पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Disease : टोमॅटो पिकातील ‘ॲन्थ्रॅकनोज’

Fertilizer Management : आले पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन

Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’ म्हणजेच खासगीकरणाकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT