Chana Market
Chana Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Chana Market : हरभऱ्याचा पेरा यंदा खरंच कमीच राहणार का?

Anil Jadhao 

देशात हरभरा दर सध्याही दबावातच आहेत. त्यामुळे शेतकरी हरभऱ्याचा पेरा (Chana Sowing) कमी करतील, असा अंदाज सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता. कारण यंदा तुरीच्या बाबतीत हा अनुभव खरिपात आला आहे. आता रब्बीची पेरणी (Rabbi Sowing) वेगाने सुरु आहे. मग यंदा हरभऱ्याची पेरणी खरंच कमी झाली का? पुढील काळात हरभरा बाजार (Chana Market) कसा राहू शकतो? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. कापूस बाजारात चढ उतार सुरुच

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. आज आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात ५ टक्क्यांनी नरमाई दिसली. कापूस दर ८८ सेंट प्रतिपाऊंडवरून ८५ सेंटपर्यंत कमी झाले. तर देशातील बाजारात कापूस स्थिर होता. कापसाला सरासरी ८ हजार १०० ते ९ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. पुढील काही दिवस कापूस दरात चढ उतार होऊ शकतात. मात्र जानेवारीत कापूस बाजार सुधारु शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.  

2. मक्याचे दर टिकून

खरिपातील मका आवक सध्या बाजारात वाढतेय. मात्र आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. खरिपातील पिकाला यंदा पावसाचाही फटका बसलाय. रब्बीतील मका पेरणीचा वेग सध्या गेल्यावर्षीपेक्षा २३ टक्क्यांनी अधिक दिसतोय. पण शेवटच्या टप्प्यात पेरा कसा राहतो? यावर बाजार अवलंबून राहील. सध्या मक्याला देशात सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काळात मका दरात २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
 

3. लाल मिरची तेजीत

देशातील बाजारात सध्या लाल मिरचीची आवक कमी आहे. त्यामुळे लाल मिरचीला चांगला दर मिळतोय. महाराष्ट्रासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बाजारातही मिरची मर्यादीत प्रमाणात येत आहे. त्यामुळं लाल मिरचीला सध्या सरासरी प्रतिक्विंटल १७ हजार ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काही दिवसांमध्ये लाल मिरचीची आवक बाजारात वाढू शकते. तोपर्यंत बाजारात मिरचीचे दरही तेजीत राहू शकतात, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

4. संत्रा दर दबावातच

बाजारात आता संत्रा दाखल झालाय. संत्र्याची बाजारातील आवकही हळूहळू वाढतेय. पण बदलत्या वातावरणामुळं संत्र्याला मिळणारा उठाव कमी दिसतोय. त्यामुळं शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. नागपूरसह महत्वाच्या बाजारांमध्ये संत्र्याची आवक जास्त दिसतेय. त्यामुळं संत्र्याला २ हजार ५०० रुपये ते ५ हजार रुपये दर मिळतोय. उन्हाचा चटका वाढल्यानंतर संत्र्याला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
 

5. देशातील रब्बी पेरणी सध्या वेगाने सुरु आहे. परतीच्या पावसामुळे पेरणीला उशीर झाला, मात्र पेरणीसाठी पुरेसा ओलावा जमिनीत होता. त्यामुळं देशातील पेरणीचा वेग गेल्यावर्षीपेक्षा काहीसा जास्त आहे. यंदा रब्बी पेरणीत दोन महत्वाच्या पिकांकडे सर्वांचं लक्ष आहे. एक म्हणजे मागील वर्षभरापासून सतत तेजीत असलेला गहू, आणि दुसरं म्हणजे सतत मंदीत असेलला हरभरा. हरभऱ्याला मागील वर्षभर कमी दर मिळला. त्यामुळं शेतकरी यंदाच्या रब्बीत हरभऱ्याचा पेरा कमी करण्याची शक्यता आहे. मात्र सध्या गेल्यावर्षीऐवढाच पेरा झाल्याचं दिसतं. गेल्यावर्षी २३ डिसेंबरपर्यंत देशात १०२ लाख ६५ हजार हेक्टरवर हरभरा पीक होतं. तर यंदा याच तारखेपर्यंत १०३ लाख ३७ हजार हेक्टरवर हरभरा लागवड झाली. म्हणजेच सध्या केवळ ७० लाख हेक्टरवरनं क्षेत्र जास्त आहे. पण अद्याप हरभरा पेरा पूर्ण झालेला नाही. मागील वर्षभर दर दबावात असल्यानं शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करु शकतात. तुरीच्या बाबतीत यंदा हाच अनुभव आला. तुरीचे दर सरकारनं वर्षभर दबावात ठेवल्यामुळं शेतकऱ्यांनी खरिपात तूर लागवड केमी केली. त्याचा परिणाम आता तूर बाजारावर जाणवतोय. हरभऱ्याच्या बाबतीतही हेच घडू शकतं, असा अंदाज सध्यातरी व्यक्त केला जातोय. मात्र शेवटी हरभरा पेरणी किती होते? उत्पादन किती मिळते? यावर सर्व गणित अवलंबून आहे. सध्या देशातील बाजारात हरभऱ्याला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर हरभरा लागवडीचं चित्र स्पष्ट होईपर्यंत कायम राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT