Chana Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हरभरा भाव ७ हजारांवर

Chana Rate : हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे.

अनिल जाधव

सोयाबीन दबावातच

सोयाबीनच्या बाजारातील पडझड थांबल्याचे दिसत आहे. तरीही सोयाबीनचा भाव निचांकी पातळीवर कायम आहे. सोमवारी दुपारपर्यंत सोयाबीनचा वायदा ९.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. तर सोयातेलाचा बाजार ३९ सेंट प्रतिपाऊंवर बंद झाला होता. तर सोयापेंडचा भाव ३०६ डाॅलर प्रतिटनांवर होता. देशातही सोयाबीनचे भाव नरमले असून ३ हजार ९०० ते ४ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसू भाव नरमले

कापसाचा बाजार निचांकी पातळीवर स्थिर आहे. कापसाचे वायदे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एका भावपातळीदरम्यान टिकून आहेत. जागतिक बाजारात यंदा कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. सध्या मात्र कापसाला उठाव कमी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव नरमले आहेत.

कापसाचे आयसीईवरील वायदे आज दुपारी ६८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभऱ्याच्या भावात तेजी

हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे. पण मागणी कायम आहे. इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत. याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर हरभऱ्याला उठाव मिळत आहे. परिणामी हरभरा भाव प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे. सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महीने आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

केळीला उठाव

श्रावण महिन्यांतील उपवासामुळे केळीला सध्या चांगला उठाव मिळत आहे. तर बाजारातील केळीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. त्यातच सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण केळीची टंचाई भासत आहे. त्यामुळे केळीचे भाव काहीसे सुधारले आहेत. सध्या केळीला सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. केळीला यापुढे श्रावण, गणपती आणि नवरात्रीत चांगला उठाव राहणार आहे. त्यामुळे केळीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

टोमॅटो बाजार स्थिरावला

बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव आला आहे. जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या सुरुवातीला बाजारात टोमॅटोची आवक कमी होती. मात्र अनेक भागातील तोडा सुरु झाल्यानंतर बाजारातील आवक वाढली. त्यामुळे भाव कमी झाले. गेल्या काही दिवसांपासून भावपातळी स्थिर दिसत आहे. सध्या टोमॅटोला सरासरी १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT