Agriculture Market Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: हरभरा, मका, ज्वारी दर स्थिर तर लसूण-आल्याला मर्यादित उठाव

Daily Commodity Rates: हरभरा, मका, लसूण, आले आणि ज्वारी या प्रमुख पिकांच्या दरांवर उत्पादन, आयात, मागणी आणि हवामानाचा मोठा परिणाम होत आहे.

Anil Jadhao 

Market Bulletin:

हरभरा भाव स्थिर

हरभऱ्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून दरात काहीसे चढ उतार होते. मात्र तीन दिवसांपासून दर स्थिरावले आहेत. देशात पुरेसा साठा असल्याने दरावर दबाव आहे. सरकारने हरभरा आयातीवर केवळ १० टक्के शुल्क लागू केले. तसेच पिवळा वाटाणा आयात मुक्त आहे. याचा दबाव दरावर येत आहे. सध्या बाजारात हरभरा ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभऱ्याला पुढे सध्या उठाव कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तसेच आयातही सुरु आहे. पण सणांची मागणी आल्यानंतर दरात काहीशी सुधारणा होऊ शकते. मात्र फार मोठ्या तेजीची शक्यता कमीच आहे, असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

मका दर टिकून

मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. बाजारातील मक्याची आवक सध्या कमी झाली. मात्र, यंदा मक्याचे उत्पादन वाढले आहे. तसेच वाढलेल्या दरात आयात वाढण्याचाही धोका आहे. मक्याचा स्टाॅकही आहे. त्यामुळे मक्याचे भाव स्थिर आहेत. सध्या देशात मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. चालू खरिपातही मक्याची लगावड वाढण्याचा अंदाज आहे. मात्र दुसरीकडे मक्याला इथेनाॅलसाठी चांगली मागणी आहे. यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात २०० ते ३०० रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.  

लसूण आवक टिकून

लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. बाजारतील लसणाची आवक वाढलेल्या पावासामुळे कमी झाली होती. मात्र लग्नसराई आणि समारंभामुळे लसणाला उठाव चांगला होता. त्यामुळे लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी ५०० ते १ हजार रुपयांची वाढ दिसून आली. लसणाचे भाव राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये सध्या ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते. तसेच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

आल्याला उठाव मर्यादीत

राज्यातील बाजारात आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत. आल्याच्या भावात काही वेळा चढ उतारही दिसून आले होते. आले लागडीसाठी बियाण्याची मागणी वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली होती. पण बियाणे मागणी पूर्ण झाल्यानंतर दर पुन्हा काहीसे कमी झाले होते. सध्या आल्याला २५०० ते ३ हजार रुपये भाव मिळत आहे. पुढील काही आठवडे बाजारातील आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. सणांची मागणी येईपर्यंत आल्याच्या दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात, अशी माहिती अभ्यासकांनी दिली. 

ज्वारीचे दर स्थिरावले

ज्वारीचे उत्पादन चांगले झाल्याने दरावर दबाव असल्याचे दिसत आहे. रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरु झाल्यानंतर दरावर दबाव वाढला होता. दरपातळी २०० ते ३०० रुपयांनी कमी झाली होती. ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे. ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल २६०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. ज्वारीची बाजारातील आवक सध्या कमी झाली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये ज्वारीची आवक कमी होण्याची शक्यात आहे. त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : 'पंतप्रधानांशिवाय देवा भाऊचं पानही हालत नाही...'; कॉंग्रेस खासदाराने संसदेत केली कर्जमाफीची मागणी

AI WhatsApp Chatbot : इक्रीसॅट व आयसीएआरचा एआय आधारित प्रकल्प महाराष्ट्रात; पेरणी, कीडरोग, हवामानाचा मिळणार सल्ला

Banana Crop Insurance: केळी पीकविमा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

Aadhaar Seva Kendra: बुलडाणा जिल्ह्यात ४५ नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना

Jayakwadi Dam: जायकवाडी ८९.६० टक्क्यांवर 

SCROLL FOR NEXT