Soybean Rate
Soybean Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean Rate : यंदा सोयाबीन उशीरा येणार ?

टीम ॲग्रोवन

झेंडू फुलांचे दर तेजीतच राहतील

1. गणोत्सवामुळं झेंडूच्या फुलांना सध्या मागणी वाढली आहे. मात्र पाऊस आणि कडी-रोगाने झेंडूचे यंदा मोठे नुकसान झाले. काही भागांत झेंडू फुलांच्या काढणीत अडचणीही येत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात मर्यादीत आवक होतेय. परिणामी झेंडूला चांगला दर मिळतोय. मात्र नुकसान वाढल्यानं पीक फायद्याचं ठरतं नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. सध्या घाऊक बाजारात झेंडूला ५ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर सणांच्या काळात टिकून राहण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

साखरेचे दर स्थिर राहण्याचा अंदाज

2. सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढली. सध्या साखरेचा दर प्रतिक्विंटल ३५०० ते ३६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. मागणी वाढल्यानंतर दर नियंत्रणात राहावेत यासाठी केंद्रानं सप्टेंबरच्या स्थानिक विक्री कोट्यात वाढ केली आहे. सप्टेंबरसाठी २३ लाख ५० हजार टन साखर विक्रीचा कोटा जाहीर केलाय. गेल्या महिन्याच्या तुलनेत दीड लाख टनांनी हा कोटा अधिक आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून सातत्याने साखरेच्या मागणीत वाढ होत आहे. पण आता साखरेचा पुरवठाही वाढणार असल्यानं दर स्थिर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

केंद्र सरकार राज्यांना स्वस्त हरभरा देणार

3. राज्यांना कमी दरात हरभरा वितरण करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र सरकार राज्यांना क्विंटलमागे ८०० रुपये कमी दराने १५ लाख टन हरभरा देणार आहे. एक वर्ष किंवा हा हरभरा विक्री होईपर्यंत सरकार ही योजना सुरु ठेवणार आहे. यासाठी केंद्र सरकार १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. हा हरभरा राज्यांना मधान्ह भोजन योजना, रेशनिंग आणि एकात्मिक बाल विकास कार्यक्रमासाठी वापरावा लागणार आहे. येणाऱ्या हंगामात खरेदी करण्यासाठी गोदामे रिकामी व्हावीत यासाठी सरकार हा हरभरा विक्री करणार आहे, असं जाणकारांनी सांगितलं. मात्र सरकारच्या या निर्णयाचा बाजारावर लगेच परिणाम जाणवला नाही. आज देशातील बाजारात हरभरा दर ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांवर स्थिर होते, असं जाणकारांनी सांगितलं.

कांद्याला हवा मागणीचा आधार

4. राज्यातील बाजारपेठांमध्ये कांदा दर दबावातच आहेत. शेतकरी सतत कांद्याला किमान प्रतिक्विंटल २२०० रुपये दर मागत आहेत. मात्र बाजारात आवक दाटल्यानं दर कमी झाले. त्यातच चाळीतील कांदाही खराब होतोय. हा कांदा चाळीत साठवून चार ते पाच महिने होत आले. त्यामुळं नुकसानीचं प्रमाण वाढल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. परिणामी बाजारात आवक वाढून दर दाबावात आलेत. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल ७०० ते १४०० रुपये दर मिळतोय. कांदा आवक कमी झाल्यास दरात सुधारणा होऊ शकते, असं जाणकारांनी सांगितलं.

यंदा सोयाबीन उशीरा येणार ?

5. देशात यंदा सोयाबीन लागवड (Soybean Cultivation) काहीशी घटली आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशातील लागवड क्षेत्र अर्ध्या टक्क्याने कमी झालं. देशात सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) मध्य प्रदेश आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. मात्र यंदा मध्य प्रदेशातील सोयाबीन पिकाला पावसाचा फटाक बसतोय. (Soybean Crop Hit By Rain) मध्य प्रदेशात आतापर्यंत ५० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा (soybean Sowing) झाला. मात्र सततच्या पावसानं पिकाची वाढ धीम्या गतीनं होत असल्याचं जाणकारंचं म्हणणं आहे. ऑगस्ट महिन्यात मध्य प्रदेशातील ५२ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत अतिजास्त पाऊस झाला. तर १४ जिल्ह्यांमद्ये जास्त पावसाची नोंद झाली. तसंच २३ जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊसमान होतं. जास्त पावसामुळं मध्य प्रदेशातील २२ महत्वाच्या भागांमधील पिकाला फटका बसला. यात भोपाळ, गुना, विदीशा आणि राजगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. पण पिकाचं नुकसान चिंताजनक नाही.

मात्र जमिनीत ओलावा अधिक असल्यानं पिकाला सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे पीक १५ दिवस उशीरा काढणीला येईल, असं जाणकारांनी सांगितलं. तर उद्योगाच्या मते, सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पाऊस जास्त असला तरी उत्पादकतेला फटका बसणार नाही. पण शेतकऱ्यांनी उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केलीये. पावसामुळं पिकावर कीड-रोग वाढल्यानं उत्पादकतेवर परिणाम होईल, असं शेतकऱ्यांनी सांगितलं. देशातील पिकाची आणि बाजाराची स्थिती पाहता यंदा सोयाबीनला ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी ही भावपातळी लक्षात ठेऊन विक्रीचं नियोजन करावं, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT