onion
onion agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : नाफेड गुजरातमध्येही कांदा खरेदी करणार

Anil Jadhao 

१) सोयाबीन दरात चढ उतार (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडच्या दरात (Soyameal Rate) चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.१३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४८७ डाॅलरवर होते. देशातील सोयाबीन बाजार मागील आठवड्यापासून स्थिर आहेत.

देशातील बाजारात सोयाबीनला सध्या ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनच्या दरातील वाढ कायम राहिल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस दर दबावात (Cotton Rate)

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज अनेक बाजार समित्या सुरु झाल्या. पण आज कापूस बाजारात संमिश्र चित्र होतं. कापसाची आवक आजही कमी होती. पण दरात सुधारणा दिसली नाही. कापसाला ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

बाजारातील आवक कापूस आवक पुढील काळातही मर्यादीत राहिल्यास कापसाची सरासरी दरपातळी वाढू शकते, असा अंदाज व्यापारी आणि कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) मका आवक घटली

देशातील बाजारात सध्या मक्याची आवक कमी दिसते. पण मक्याचे दर काहीसे नरमलेले आहेत. मक्याची आवक पुढील महिन्यापासून वाढेल. रब्बीतील मका एप्रिलपासून बाजारात येईल. त्यामुळे व्यापारी आणि उद्योग या नव्या मक्याची वाट पाहत आहेत.

परिणामी सध्या मक्याला २ हजार ७० ते २ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. यंदा मक्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे मक्याचे दर ऐन आवेकच्या हंगामात हमीभावाच्या दरम्यान राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

४) लसणाचे भाव तेजीत

राज्यातील बाजारात सध्या लसणाची आवक कमी आहे. त्यामुळे लसणाला चांगला दर मिळतोय. पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नाशिक या बाजारांमधील आवक काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे.

त्यामुळे लसणाला प्रतिक्विंटल ४ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही लसणाची आवक मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लसणाचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

५) कांदा दर पुढील काळात सुधारतील का?

देशातील लाल कांदा उत्पादन वाढल्यामुळे दर पडले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून कांदा आवकेचा दबाव जास्त होता. त्यामुळं कांद्याचे भाव अगदी २०० रुपयांपासून सुरु झाले. उत्पादन खर्च प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये येतो.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा दर पडल्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. कारण कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. देशातील एकूण कांदा उत्पानातमहाराष्ट्राचा वाटा जवळपास ४३ टक्के आहे.

मध्य प्रदेशचा वाटा १६ टक्के आहे. तर गुजरात आणि कर्नाटक ९ टक्के उत्पादन घेतात. कांदा दर पडल्यानंतर नाफेडने महाराष्ट्रात खरेदी सुरु केली. महाराष्ट्रात नाफेडने आत्तापर्यंत ४ हजार टन कांदा खेरदी केला. तसेच गुजरातमध्येही उद्यापासून कांदा खेरदीसाठी तीन केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

लाल कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्याने त्याची विक्री लगेच करावी लागते. त्यासाठी दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोची इ. ठिकाणी विकण्यासाठी व्यवस्था उभी करण्यात आली आहे.

पण नाफेडची खरेदी फक्त नावापुरतीच होत असल्याची टिका शेतकरी करत आहेत. लाल कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्यानं नाफेडने जास्त खरेदी करत नाही. त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदीऐवजी थेट अनुदानाची मागणी करत आहेत.

लाल कांदा आवकेचा दबाव आणि दोन ते तीन आठवडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं लाल कांदा दरावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT