Onion Rate : महाराष्ट्रात कांदा दर कोसळल्यानंतर नाफेडने (Nafed) खरेदी सुरु केली. पण नाफेडची कांदा खरेदी फक्त नावालाच होत असल्याची टिका शेतकरी करत आहेत. आता नाफेड पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या राज्यात गुजरातमध्येही कांदा खरेदी सुरु करणार आहे.
गुजरातमधील कांदा दरातील (onion Bajarbhav) घसरण नाफेडच्या खरेदीने थांबेल, असा दावा केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्रायलाने केला आहे.
देशात सध्या कांदा दराचा प्रश्न निर्माण झाला. देशातील लाल कांदा उत्पादन वाढल्यामुळे दर पडले आहेत. फेब्रुवारी महिन्यात कांदा आवकेचा दबाव जास्त होता. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे भाव अगदी २०० रुपयांपासून सुरु झाले.
उत्पादन खर्च प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये येतो. पण बाजारातील कांदा दरातून शेतकऱ्यांचा वाहतुक खर्चही निघत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा दर पडल्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. कारण कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
भारतात कांदा तीन हंगामात घेतला जातो. खरिप, लेट खरिप आणि रब्बी असे तीन हंगाम समजले जातात. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. पण महाराष्ट्राचा वाटा जवळपास ४३ टक्के आहे.
मागील काही वर्षांपासून इतर राज्यांतील क्षेत्र वाढत असल्याने महाराष्ट्राचा कांदा उत्पादनातील वाटा काहीसा कमी झाला आहे. मध्य प्रदेशचा वाटा १६ टक्के आहे. तर गुजरात आणि कर्नाटक ९ टक्के उत्पादन घेतात.
लाल कांद्याचे भाव पडल्याने नाफेडने कांदा खरेदी सुरु केली. महाराष्ट्रात नाफेडने आत्तापर्यंत ४ हजार टन कांदा खेरदी केला. लाल कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्याने त्याची विक्री लगेच करावी लागते.
त्यासाठी दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोची इ. ठिकाणी विकण्यासाठी व्यवस्था उभी करण्यात आली आहे.
या ठिकाणी होणार खरेदी
महाराष्ट्रासोबतच गुजरातमध्येही कांद्याचे भाव कमी झाले. त्यामुळे नाफेड आता गुजरातमध्येही खरेदीत उतरणार आहे. गुरुवारपासून गुजरातमधील तीन केंद्रावर कांदा खरेदी केला जाणार आहे.
गुजरातमधील भावनगर, गोंडल आणि पोरबंदर बाजार समित्यांमध्ये गुरुवारपासून कांदा खेरदी सुरु होणार आहे. तसेच गरजेनुसार आणखी केंद्रे सुरु करण्यात येतील, असे केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.
कांदा दरातील घसरण थांबेल
शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न आहे. नाफेडच्या खेरदीने गुजरातमधील कांदा दरातील घसरण थांबेल. शेतकऱ्यांनी चांगल्या गुणवत्तेचा आणि वाळेलला कांदा आणवा. या कांद्याला नाफेडच्या केंद्रावर चांगला भाव मिळेल.
शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट मिळेल. कांदा दर पडलेल्या काळात शेतकऱ्यांना चांगाल दर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे अवाहन केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाने केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.