market bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : लिलाव बंदमुळे बाजाराची कोंडी कायम

Market Bulletin : कांदा बाजाराची कोंडी कायम आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यानी लिलाव बंद केल्यामुळे व्यवहार ठप्प आहेत.

Team Agrowon

1. देशातील बाजारात सध्या कापसाची आवक कमीच आहे. उत्तर भारतासह काही भागात नवा कापूस बाजारात येत आहे. तसच सध्या अनेक भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे कापूस वेचणीत अडचणी येत आहेत. बाजारात सध्या कापूस आवक कमी असल्याने 7500 ते 8000 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. कापसाचे भाव पुढील काळातही टिकून राहतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. 

   
2. सोयाबीनची भवपातळी गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहे. खाद्यतेल आयातीचा दबाव सोयाबीन बाजारावर आहे. सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल 4600 ते 5000 हजारांचा भाव मिळत आहे. पण यंदा देशातील सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. आधी दुष्काळी स्थिती, आता जोरदार पाऊस आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव झालाय. याचाही पिकाला फटका बसत आहे. त्यामुळेचे पुढील काळातही सोयाबीनचे भाव कायम राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

3. टोमॅटो अजूनही दबावातच आहे. टोमॅटोचे भाव मागील दीड महिन्यापासून दबावात आले आहेत. देशातील बाजारात टोमॅटो आवक वाढलेली आहे. तसेच टोमॅटोचा उठावही स्थिर आहे. त्यामुळे भाव दबावात आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल 400 ते 700 रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काही दिवस टोमॅटोचे भाव दबावातच राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

4. देशात तूर तेजीतच आहे. उत्पादन घटल्याने तुरीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सणामुळे तुरीला उठाव चांगला आहे. परिणामी तुरीचे भाव तेजीत आहेत. सध्या तुरीला सरासरी प्रतिक्विंटल 11 हजार ते 12 हजार रुपये भाव मिळत आहे. तुरीचे भाव पुढील काळातही तेजीतच राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

5. कांदा बाजाराची कोंडी कायम आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यानी लिलाव बंद केल्यामुळे व्यवहार ठप्प आहेत. आधीच सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले. त्यामुळे कांदा बाजारावर दबाव आला. कांद्याचे भाव 2500 रुपयांवरून 1800 रुपयांवर आले. तर सरासरी भावपातळीही 700 रुपयांनी कमी झाली. भाव कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. त्यातच व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद केल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. पण व्यापाऱ्यांनी कांदा निर्यातीवर लावलेले शुल्क कमी करण्याचीही मागणी केली. नफेडच्या कांदा खरेदी आणि विक्रीवरही व्यापाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शेतकऱ्यांचीही मागणी आहे की नाफेडने बाजारात येऊन कांदा खरेदी करावी. नाफेडची खरेदी बाजारात झाल्यास कांदा बजारालाही आधार मिळेल, असे शेतकरी सांगत आहेत. व्यापाऱ्यांच्या लिलाव बंदमुळे नाशिक जिल्ह्यात कांदा व्यवहार बंद असेल तरी राज्याच्या इतर भागात व्यवहार सुरू आहेत. नाशिकमधील लिलाव बंदमुळे इतर बाजारात भाव काहीसे वाढलेले दिसतात. सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 1700 ते 2000 रुपयांचा भाव मिळत आहे. सध्या कांदा भाव दबावात असले तरी पुढील काळात बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळू शकतो, असे जाणकारांनी सांगितले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT