Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीच्या भावात काहीशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, ज्वारी, तसेच काय आहेत तूरीचे दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन बाजार निचांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीयबाजारातील सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील नरमाई कायम आहे. सोयाबीनला उठाव मिळत नसल्याने आणि दुसरीकडे विक्री वाढल्याने दबाव आला आहे. आज सोयाबीन दुपारपर्यंत वायद्यांमध्ये १०.११ डाॅलर प्रतिबुशेल्सचा भाव मिळत होता. तर सोयापेंड ३१६ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचा उठाव कमीच

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कापसाचा भाव दबावातच आहे. कापसाला तसेच सुताला उठाव मिळत नसल्याने भाव कमी झाल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाची विक्री वाढलेली आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६८.९४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार ६२० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मक्याचे भाव टिकून

देशातील बाजारात मक्याचा भाव टिकून आहे. देशात यंदा मक्याला चांगला उठाव आहे. इथेनाॅल उद्योग यंदा मक्याचा वापर वाढविणार आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला मक्याचा काहीसा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मक्याचा भाव टिकून आहे. मक्याला सध्या सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळाला. एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केंद्रावर २ हजार ९९८ रुपये भाव मिळाला. मक्याचा भाव तेजीतच राहतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

तुरीमध्ये काहीशी नरमाई

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ज्वारीचा बाजार कायम

ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे. बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली. ज्वारीचा बाजार सध्या दबावात आला आहे. राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे. पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला सरासरी वाणानुसार २ हजार ३०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT