Tur Market Agrowon
बाजार विश्लेषण

Tur Market Update: तुरीच्या दरातील तेजी आणखी वाढेल का?

Tur Bajarbhav : देशातील बाजारात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. पण तुरीच्या दरात आणखी तेजीची अपेक्षा सध्यातरी धुसर दिसत आहे. कारण सराकर तुरीच्या बाजारावर सतत लक्ष आणि दबाव ठेऊन आहे.

Team Agrowon

अनिल जाधव
Pune Tur Market Rate : देशातील बाजारात सध्या तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. पण तुरीच्या दरात (Tur) आणखी तेजीची अपेक्षा सध्यातरी धुसर दिसत आहे.

कारण सराकर तुरीच्या बाजारावर (Tur Market) सतत लक्ष आणि दबाव ठेऊन आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी मर्यादीत दिसत आहे.

सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजार २०० रुपयांचा भाव मिळतोय. पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात तुरीचे दर तेजीतच आहेत. मागील ९ महिन्यांपासून तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच यंदा तूर भाव खाणार हे स्पष्ट दिसत होते. तसेच घडतही आहे. पण सरकारने तुरीच्या बाजारावर दबाव वाढवून तेजी मर्यादीत ठेवली.

तूर मेपर्यंत १० हजार रुपयांचा टप्पा गाठेल, असा अंदाज काही विश्लेषक बोलून दाखवत होते. पण सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांवर दबाव वाढवून दरातील तेजीला लगाम लावला. त्यामुळे तुरीचे सरासरी दर मागील सहा महिन्यांपासून कायम दिसतात.

बाजारात सध्या तुरीला गरजेप्रमाणे उठाव मिळत आहे. कारण सरकार सतत तुरीच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. तसेच तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकार कोणताही निर्णय घेऊ शकते, असे स्पष्ट संकेत सरकारकडूनच वेळोवेळी देण्यात आले.

देशात यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने दरात तेजी आहे. देशातील बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार १०० रुपयांचा भाव मिळतोय.

तूर डाळीचे भाव अनेक बाजारात सध्या १३० रुपये प्रतिक्विंटलवर आहेत. पुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. 

सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादरांना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्यास सांगितले. चुकीची माहिती दिल्यास कारवाईचाही इशारा दिला.

तसेच तुरीचे भाव कमी केले नाही तर सरकारचं आयातीचा विचार करेल, असाही इशारा देण्यात आला. पण आयात तुरीचे भावही जास्त आहेत. 

सध्या म्यानमारमध्ये तुरीची उपलब्धता जास्त आहे. पण येथून तूर आयात करायची म्हटल्यास प्रतिक्विंटल ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव पडत आहे.

म्यानमारमध्ये तुरीच्या दरात मागील तीन महिन्यांमध्ये १५० डाॅलरची वाढ झाली आहे. यामुळे सरकारला स्वस्त तूर लगेच मिळण्याची शक्यता कमीच आहे.

त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. तुरीच्या दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी वक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान

Sesame Production: खानदेशात तीळ उत्पादन कमी

Farmer Participation: धोरणात्मक निर्णयात हवा शेतकऱ्यांचा सहभाग

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

SCROLL FOR NEXT