Soybean Market  Agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Market: सोयाबीन दर कधी आणि किती वाढतील?

देशातील बाजारात आजही सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही. आजही सोयाबीनचे दर स्थिर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार आजही कायम होते.

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः देशातील बाजारात आजही सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही. आजही सोयाबीनचे दर (Soybean Rate) स्थिर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार आजही कायम होते.

पण सोयाबीन उत्पादकांना (Soybean Producer) चालू महिन्यातच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सोयाबीन दरवाढीसाठी पोषक स्थिती असल्याचं सांगितलं जातं.

जानेवारी महिन्यात सोयाबीन दर वाढीचा अंदाज आहे, असे सोयाबीन बाजारातील (Soybean Market) अभ्यासकांनी सांगितले.

आज शुक्रवारनंतर सोयाबीनचे वायदे सुरु झाले. पण आजही सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु होते. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १५.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते.

रुपयात हा दर ४ हजार ५८२ रुपये होतो. पण आज बाजार सुरु झाल्यानंतर दर काहीसे कमी झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आज सोयाबीनचे वायदे १५.१७ डाॅलरवर होते.

म्हणजेच वायदे ४ हजार ५५२ रुपये प्रतिक्विंटलवर पोचले होते. दुपारनंतर आज सोयाबीनच्या वायद्यांमध्ये वाढीचा ट्रेंड होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयातेलाचेही दर काहीसे वाढून ६३ सेंटवर पोचले होते. मात्र सोयापेंडच्या दरात काहीशी घट पाहायला मिळाली.

आज सोयापेंडचे वायदे ४७० डाॅलरवर होते. शुक्रवारच्या तुलनेत सोयापेंडच्या दरात टनामागं ५ डाॅलरची तुट होती. पण तरीही सोयापेंडचे दर तेजीत आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

आंतरराष्ट्रीय  बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड तेजीत असतानाही देशातील सोयाबीन दर  मात्र स्थिर आहेत.

आजही सोयाबीनला ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर बाजारातील आवक सरासरी साडेचार लाख क्विंटलच्या दरम्यान होती.

सोयाबीनचे दर स्थिर असल्यानं आजही शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.


दर का स्थिर होते?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत असताना देशातील दर का स्थिर आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.

तर त्याचं असं आहे की, एरव्ही शेतकरी डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री जास्त करत होते. त्यामुळं आवक वाढून दर कमी होत होते.

म्हणजेच सोयाबीन कमी दरात मिळत होतं. पण यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवलं. त्यामुळं बाजारात आवक कमी झाली.

मात्र व्यापारी आणि उद्योगांना कमी दरात माल मिळण्याची अपेक्षा होती. त्यातच मागीलवर्षीचा साठा आणि यंदाची खरेदी यामुळं उद्योगांची गरज भागत होती.

त्यामुळं बाजारातील आवक कमी असूनही उद्योगांची गरज भागत होती. परिणामी देशातील दर स्थिर होते.

दर का वाढू शकतात?
आता उद्योगांकडील साठा कमी झाला. त्यामुळं उद्योगांना खरेदीत उतरावे लागेल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला मागणी वाढण्याचाही अंदाज आहे.

चीन यंदा सोयाबीनची आयात वाढवणार आहे. तसंच अर्जेंटीनातील उत्पादन घटणार आहे. त्यामुळं जानेवारीच्या शेवटी सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

काय राहील दरपातळी?
सध्या सोयाबीन दर दबावात असले तरी पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनची दरपातळी वाढेल. पुढील काळात सोयाबीनला ५५०० ते ६ हजार रुपये दर मिळू शकतो.

त्यामुळं शेतकऱ्यांनी ५५०० रुपयांपेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करु नये, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT