Market Bulletin Agrowon
बाजार विश्लेषण

Agrowon Podcast : हळदीला बाजारात काय भाव मिळतोय?

Market Bulletin : देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीनची भावपातळी सतत बदलत आहे.

Anil Jadhao 

Market Intelligence : देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात नरमाई आली होती. सोयाबीनचे भाव अनेक बाजारात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांपर्यंत तुटले होते. बाजारात आज सोयाबीनला सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजारांचा भाव मिळाला. तर बाजारातील आवक सरासरी राहिली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भावही कालच्या तुलनेत आज दुपारपर्यंत काहीसे कमी झाले होते. देशातील प्रक्रिया प्लांट्सचे भाव आज ५ हजार १०० ते ५ हजार २५० रुपयांच्या दरम्यान होते. तर सोयापेंडचे भाव ४३ ते ४४ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आले होते. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाच्या भावात काहिसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७८ सेंट ते ८० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान दिसून येत आहेत. तर देशातील बाजारात कापसाचा भाव सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होता. बाजारातील आवक सरासरी असल्याचे सांगितले जाते. उद्योगांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात रोज दीड लाख गाठी कापूस येत आहे. तर आतापर्यंत ४७ लाख गाठी कापूस बाजारात आला. पण पावसाने कापूस पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजारात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

जिऱ्याच्या भावात दिवाळीच्या आधीपासूनच नरमाई येत गेली. जिऱ्याचा भाव मागील काही वर्षातील उचांकी पातळीवर गेल्यानंतर लागवड वाढण्याची शक्यता होता. याचा परिणाम भावावर येत गेला. स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांनी नफावसुलीसाठी विक्री केल्याने जिऱ्याचे भाव कमी झाले होते. सध्या जिऱ्याला बाजार समित्यांमध्ये प्रतिक्विंटल सरासरी ४२ हजार ते ४४ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर वायद्यांमध्ये ४४ हजार ते ४६ हजारांच्या दरम्यान व्यवहार होत आहेत. गुजरात आणि राजस्थानमध्ये जिऱ्याची लागवड सुरू झाली असून लागवडीत मोठी वाढ झाली. याचा परिणाम दरावर आणखी दिसू शकतो, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारी पिकाला पावसाचा चांगलाच तडाखा बसला. आधीच बाजारात ज्वारीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव तेजीत आहेत. आता पावसाने नुकसान झाल्यामुळे उत्पादनाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. बाजारात सध्या ज्वारीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणं भाव मिळतोय. मालदांडी ज्वारीचे भाव सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजारांच्या दरम्यान पोचले. तर हायब्राडी ज्वारी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. पांढरी आणि दादर ज्वारीचा भाव ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसतो. बाजारातील आवक आणखी काही दिवस कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्वारीच्या भावातील तेजी टिकून राहू शकते, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

देशातील बाजारात हळदीच्या भावात चढ उतार सुरु आहेत. ऐन दिवाळीच्या काळात नरमाई आल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा झाली होती. हळदीच्या भावाने अनेक बाजारात १२ हजारांचा टप्पा गाठला आहे. सध्या हळदीचा सरासरी १२ हजार ते १३ हजारांचा भाव मिळत आहे. हळदीचे नवे पीक जानेवारीपासून बाजारा येण्यास सुरुवात होईल. पिकांच्या स्थितीचे अहवाल पुढे येतात तसे बाजारातही बदल होत आहेत. नव्या पिकाचे उत्पादन यंदाही कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्याचे मुख्य कारण आहे पिकाला जाणवत असलेली पाणीटंचाई, बदलत्या वातावरणाचा परिणाम आणि अवकाळी पावसाचा फटका. पण नवे पीक बाजारात येण्याच्या आधी व्यापारी आपला स्टाॅक बाहेर काढू शकतात. त्यामुळे दरात चढ उतारही दिसूी शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Forest Tourism: पुणे जिल्ह्यातील वनपर्यटनात क्षमता मोठ्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Kharif Sowing: राज्यात खरीप पेरा अंतिम टप्प्यात

Code of Conduct Violation Case: मोदींवर आचारसंहिता भंगप्रकरणी  कारवाईस आयोगाची टाळाटाळ

Soil Testing: मृद्‌ चाचणी प्रयोगशाळेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Bacchu Kadu: शेतकरी आत्महत्याप्रश्‍नी ‘सिंदूर यात्रा’ काढणार : कडू

SCROLL FOR NEXT