Soybean Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत

देशात मागील दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर स्थिर आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आहेत.

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः देशात मागील दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर (Soybean Rate) स्थिर आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आहेत.

तर सोयापेंडचे दरही मागील सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे (Soyacake) दर तेजीत असल्याचा फायदा देशातील सोयाबीन बाजारालाही (Soybean Market) आधार मिळू शकतो, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात सोयाबीनचे दर आजही कायम होते. गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर एका भावपातळीभोवती फिरत असल्यानं बाजारातील आवकही मर्यादीत आहे.

आजही अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन राखून ठेवले आहे. देशातील बाजारात सोयाबीनची आवक आजही कमीच होती.

देशात आज जवळपास ५ लाख ३० हजार क्विंटल आवका झाली होती. आज मध्य प्रदेशातील सोयाबीन आवक सर्वाधिक होती.

आज मध्य प्रदेशातील बाजारात जवळपास २ लाख ५० हजार क्विंटल सोयाबीन आवक झाली होती.

तर महाराष्ट्रात जवळपास २ लाख क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. तर राजस्थानमध्ये ४० हजार क्विंटल आणि इतर राज्यातील बाजारात ४० हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते.

देशात आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर महाराष्ट्रात आजही हीच दरपातळी कायम होती.

तर देशातील प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते.

तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली.

दुपारी तीन वाजेपर्यंत सोयाबीनचा भाव १५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचला होता. शुक्रवारच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे जवळपास एक टक्क्यांची वाढ झाली होती.

तर सोयातेलाचे दरही एख टक्क्यांनी वाढले होते. सोयापेंडच्या दरातही किंचित सुधारणा पाहायला मिळाली. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढत आहेत. तसेच सोयापेंडचेही दर तेजीत आहेत. खाद्यतेल बाजाराचाही आधार सोयाबीनला मिळत आहे.

आज पामतेलाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. त्यामुळे सोयातेलाचेही दर वाढले होते. या सर्व घटकांमुळे सोयाबीनच्या दरातही सुधारणा होऊ शकते.

याचा फायदा देशातील सोयाबीन बाजारालाही मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT