Maize Market Agrowon
बाजार विश्लेषण

Maize Market: मका उत्पादन घटणार; दर कसे राहतील?

देशातील मका बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. पण बाजारातील मका आवक सरासरीपेक्षा कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले. तर देशातील मका उत्पादन यंदा कमी राहील, असा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला.

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणे ः देशातील मका बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. पण बाजारातील मका आवक (Maize Arrival) सरासरीपेक्षा कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले. तर देशातील मका उत्पादन (Maize Production) यंदा कमी राहील, असा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला. त्यामुळे पुढील काळात मक्याचे दर (Maize Rate) वाढण्याची शक्यता आहे.

बाजारात मागील काही दिवसांमध्ये मका दर स्थिरावले आहेत. पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांनी मका निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही, मात्र त्याचा मानसिक परिणाम बाजारावर जाणवत आहे. मात्र यंदा सरकारनं निर्यातबंदी केली तरी दरावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण निर्यातबंदीच्या मागणीचा परिणाम आधीच दरावर झाला आहे. मक्याचे दर सरासरी २ हजार ५०० रुपयांवरून नरमले आहेत.  

देशातील महत्वाच्या महत्वाच्या मका उत्पादक भागांतील बाजार समित्यांमध्ये सध्या खरिपातील मक्याची आवक वाढत आहे. तसंच यंदा देशातील मका उत्पादन गेल्यावर्षीपे७ा कमी राहील, असा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला. मागील हंगामात देशात खरिप आणि रब्बी दोन्ही हंगामात ३३६ लाख टन मका उत्पादन झाले होते. मात्र यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमा उत्पादन ३२० लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज आहे.

मक्याचा वापर वाढणार
देशातील मक्याचा वापर मात्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या हंगामात देशातील मका वापर २९९ लाख टनांवर होता. तो चालू हंगामात ३०१ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. पण कमी उत्पादन आणि वाढलेला वापर यामुळं निर्यात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा भारतातून २८ लाख टन मका निर्यात होईल. मागील हंगामातील मका निर्यात ३४ लाख ५० हजार टनांवर पोचली होती.

कसा राहील बाजार?
सध्या मक्याचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत. सरकारने खरिपासाठी मक्याला १ हजार ९६५ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या बाजारात मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपये दर मिळतो आहे. सरकारने निर्यातबंदी केली नाही, किंवा बाजारात हस्तक्षेप केला नाही, तर मक्याच्या दरात २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Prof. M.S. Swaminathan Award 2024-25 : २०२४-२५ चा स्वामीनाथन पुरस्कार डॉ.चेरुकुमल्ली श्रीनिवास राव यांना जाहीर

Nar-Par Girna Project: नार पार -गिरणा प्रकल्पाबाबत सरकारची अनास्था

Land Preparation: जमीन पूर्वमशागतीला वेग

Banana Care in Rain: अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामध्ये केळी बागेचे व्यवस्थापन

Agrowon Podcast: सोयाबीनमधील वाढ कायम; कापूस दरात सुधारणा, गवार तेजीत, गव्हाची आवक वाढली तर डाळिंब तेजीत

SCROLL FOR NEXT