Tur Market : तुरीचे भाव कसे राहतील?

Anil Jadhao 

यंदा देशातील तूर उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने तुरीचे दर टिकून राहतील, असा अंदाज होता. मात्र देशातील बाजारात सध्या तुरीचे दर नरमलेले दिसत आहेत. तरीही दर हमीभावापेक्षा जास्त आहेत.

केंद्राने यंदा तुरीसाठी प्रति क्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. तर सध्या बाजारात तुरीला ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांपर्यंत दर आहेत.

नोव्हेंबरमध्ये तुरीला सरासरी ७ हजार ५०० ते ७ हजार ९०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात वाढली. तसेच देशातील बाजारांत नवे पीक दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दर नरमल्याचं सांगितलं जातंय.

तूर उत्पादनात कर्नाटक आणि महाराष्ट्र देशात आघाडीवर आहेत. या राज्यांत काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरु झाली. सध्या नव्या तुरीमध्ये ओलावा जास्त आहे. त्यामुळे या तुरीला ६ हजार ४०० रुपये ते ७ हजार २०० रुपये दर मिळत आहे.

यंदा देशातील तूर उत्पादन घटणार आहे. त्यामुळे यंदा विक्रमी आयात झाली तरी त्याचा दरावर फारसा परिणाम होणार नाही, असं काही अभ्यासक सांगत आहेत.

सरकारही यंदा तुरीची खरेदी वाढवण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे यंदा तुरीला सरासरी ७ ते ८ हजारांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

cta image