Sugarcane Farming: उसाचे उत्पादन घेताना शेतकरी जास्त टन ऊस घेण्यावर सहसा भर देतात. परंतु साखरेच्या वजनासोबत त्याचा उतारा चांगला मिळणेही आवश्यक असते. त्यामुळे उसाच्या उतारा वाढवण्यावर भर देण्यासाठी उसाची पक्वता, खतांचा शिफारशीनुसार वापर, उसाची लागवड आणि काढणीचे गणित बसवणे, जमीन सुपीकतेवर भर देण्याची गरज असते..१. तोडणीपूर्वी गरजेपेक्षा जास्त पाणी नकोतोडणीच्या अगोदर जास्त पाणी दिल्यास उसातील रस पातळ होऊ शकतो. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. पाणी व्यवस्थापन हा ऊस उत्पादन आणि साखर उतारा या दोन्हीसाठी महत्त्वाचा घटक असतो.२. अनावश्यक खत टाळा.विशेषतः नत्रयुक्त खतांचा अतिरेक झाल्यास उसाची शाकीय वाढ वाढत राहून पक्वतेवर परिणाम होऊ शकतो. खतांचे नियोजन शिफारशीनुसार करावे. ऊस पक्वतेकडे जात असताना गरज नसताना खत देत राहणे टाळावे. खत व्यवस्थापनाचा कालावधी व मात्रा हंगाम, वाण, जमीन आणि स्थानिक शिफारशीनुसार ठरवावी..Sugar Recovery: साखर उतारा वाढविण्यासाठी कारखाना पातळीवरील उपाययोजना.३. उसाची हिरवी पाने मोठ्या प्रमाणात काढू नका.चाऱ्यासाठी हिरवी पाने काढल्यास पिकातील नैसर्गिक अन्नद्रव्य पुनर्चक्रीकरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पानतोड टाळावी.४. ऊस तोडणी जमिनीपासून उंचावर करू नका.खालच्या कांड्यांमध्ये पक्वता जास्त असते. त्यामुळे ऊस शक्य तितका जमिनीलगत तोडण्याकडे लक्ष द्यावे..५. लवकर कारखान्यात पोहोचवातोडणीनंतर ऊस लवकर कारखान्यात पोहोचवणे महत्त्वाचे आहे. साखर उतारा आणि ऊस गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य तोडणी व गाळप नियोजनावर भर देण्याची गरज असते.६. तोडलेल्या उसावर ऊन पडू देऊ नका.तोडणीनंतर जास्त वेळ उघड्यावर ठेवल्यास ऊसाची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तोडणी, वाहतूक आणि गाळप यामध्ये उगाचच उशीर टाळावा..Sugarcane Flowering: तुऱ्यामुळे ऊस उत्पादन घटते का? वेळीच करा उपाययोजना.७. १२ महिने पीक’ या गणितावर अवलंबून राहू नका.उसाला शेतात जास्त दिवस ठेवले म्हणजे साखर उतारा त्याच प्रमाणात वाढेलच असे नाही. वाण, हंगाम आणि पक्वतेनुसार तोडणीचे नियोजन करणे गरजेचे आहे.८. पीक फेरपालटाकडे दुर्लक्ष करू नका.सलग ऊस घेतल्याने जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता प्रभावित होऊ शकते. ऊस विकास कार्यक्रमातही जमीन सुपीकता टिकवणे हा महत्त्वाचा मुद्दा नमूद केला आहे..९. पाणी आणि खतांचा अंदाजे वापर टाळा.‘जास्त खत म्हणजे जास्त ऊस’ किंवा ‘जास्त पाणी म्हणजे जास्त वजन’ हा दृष्टिकोन टाळून उत्पादनासोबत साखर उताऱ्यावरही लक्ष शेतकऱ्यांनी द्यावे.१०. वाण आणि तोडणीचा हंगाम जुळवा.वेगवेगळ्या वाणांची पक्वता वेगवेगळ्या काळात होते. त्यामुळे वाणनिहाय लागवड आणि पक्वतेनुसार तोडणीचे नियोजन केल्यास साखर उतारा सुधारण्यास मदत होऊ शकते..फक्त टनेजकडे पाहू नका.ऊसाचे जास्त वजन मिळणे आणि त्यातून जास्त साखर मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ‘जास्त ऊस’सोबत ‘जास्त साखर उतारा’ हेही उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.