Cotton Market Agrowon
बाजार विश्लेषण

Cotton Market : बाजारातील कापूस आवक कमीच

देशातील बाजारात कापसाचे दर आजही काहीसे स्थिर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात जास्त तुट आली नव्हती. पण शेतकरी अद्यापही आणखी दरवाढीची वाट पाहत आहेत. त्यामुळं बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा कमीच आहे.

Team Agrowon

अनिल जाधव

पुणेः देशातील बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) आजही काहीसे स्थिर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात जास्त तुट आली नव्हती.

पण शेतकरी अद्यापही आणखी दरवाढीची वाट पाहत आहेत. त्यामुळं बाजारातील कापूस आवक (Cotton Arrival) सरासरीपेक्षा कमीच आहे. 

मागील चार आठवडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात (Cotton Market) मोठे चढ उतार होत आहेत. सीबाॅटवरील वायदे शुक्रवारी वाढीसह बंद झाल्यानंतर सोमवारी बाजार तुटत होता.

आठवडाभर तेजी मंदी येत पुन्हा शुक्रवारी दर वाढत होते. हे समिकरण दिसत होते. मात्र आज दुपारर्यंत कापसाचे दर शुक्रवारच्या तुलनेत जास्त तुटले नाहीत.

कापूस दराने शुक्रवाच्या दराशी बरोबर केली होती.

दुपारी २ वाजेपर्यंत कापसाचे वायदे ८५.४७ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. शुक्रवारी कापसाचे वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. म्हणजेच आज वायदे शुक्रवारच्या तुलनेत जास्त नरमले नाहीत.

तर देशात आजही कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपये दर मिळाला. तर देशातील मोजक्या बाजारात कापसाला ९ हजार २०० रुपये दर मिळाला.

राज्यातील बाजारातही कापसाची दरपातळी ८ हजार ३०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. तर राज्यातील काही बााजारांमध्येही कापसाला ९ हजारांपेक्षा जास्त दर मिळाला.

मागील एक आठवड्यापासून कापसाचे दर वाढले आहेत. मात्र शेतकऱ्यांना आणखी दरवाढीची अपेक्षा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजारातील विक्री अद्यापही वाढवली नाही.

देशातील बाजारात सध्या सरासरीपेक्षा ३० टक्क्यांपर्यंत कमी आवक असल्याचं व्यापारी सांगत आहेत. तर सरासरी दर ९ हजारांपेक्षा जास्त झाल्यास कापूस विक्री करू, असं काही शेतकरी सांगत आहेत.

म्हणजेच देशातील कापसाचा दरासरी दर ९ हजारांच्या पुढे गेल्यास बाजारातील कापूस आवक वाढू शकते, असा अंदाज आहे.

देशातील आणि आंतरराष्ट्रीय कापूस बाजारातील स्थिती पाहता यंदा शेतकऱ्यांना कापसासाठी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळू शकतो.

त्यामुळं शेतकऱ्यांनी आपलं दराच टार्गेट ठेऊन टप्प्याटप्प्यानं विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT