China's cheap yarn scares cotton growers? Agrowon
बाजार विश्लेषण

Cotton : चीनच्या स्वस्त सुताची कापूस उत्पादकांना धास्ती?

चीनमधून सूत आयात आयात थांबविण्याची मागणी

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः देशातील नवा कापूस हंगाम आता सुरु झालाय. अनेक बाजारांमध्ये कापूस दाखल होतोय. पुढील महिन्यात कापसाची आवक वाढेल. पण यंदा कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज उद्योग व्यक्त करत असल्यानं बाजार काहीसा दबावात येतोय. त्यातच आता चीनमधून सूत आयात वाढतेय. याचाही दबाव कापूस बाजारावर येण्याची शक्यता व्यक्त होतेय. 

भारतात चीनमधून शिलाई धाग्याची आयात होत असते. मात्र आता कापूस सुताचीही आयात वाढली. तसं पाहीलं तर भारताचा कापूस आणि सूत जागतिक बाजारात इतर देशांपेक्षा स्वस्त असते. मात्र मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यापासून कापूस आणि सुताच्या दरात मोठी झाली. त्यामुळं भारतीय सूत महाग झालं. त्यातच अमेरिकेने चीनमधील शिनजियांगमधून येणाऱ्या कापूस आणि कापूस उत्पादनांना जून २०२२ पासून बंदी घातली. शिनजियांग प्रांतात मानवी अधिकाराच उल्लंघन होतं तसचं मजुरांनी बळजबरी कामाला लावले जाते, असा आरोप अमेरिकेने केला आहे. 

अमेरिकेने आयात बंद केल्यानंतर चीनच्या कापूस आणि सुताचे दर पडले. हक्काची बाजारपेठ गेल्यानं चीन कापूस आणि सुतासाठी बाजार शोधत होता. त्यातच भारतात सुताचा तुटवडा निर्माण होऊन दर वाढले होते. त्यामुळं चीनच्या स्वस्त सुताची भारतात आयात वाढली.

चीनची सूत किती स्वस्त?
चीनचं सूत भारतातील सुताच्या तुलनेत जवळपास २० टक्क्यांनी स्वस्त आहे. त्यामुळं जून महिन्यापासून सुताची आयात जवळपास चार पटींनी वाढली. यंदा मे महिन्यात जवळपास ३३ हजार किलो सुताची चीनमधून आयात झाली होती. तर जून महिन्यातील आयात दीडलाख किलोवर पोचली. आयातीत वाढ होऊन जुलै महिन्यात १ लाख ८९ हजारांवर पोचली. ऑगस्ट महिन्यात यापेक्षाही अधिक आयात झाल्याचा अंदाज आहे.

आयात किती वाढली?
सध्या चीनमधून आयात होणाऱ्या सुतावर १८ टक्के मूळ आयातशुल्क आणि इतर काही कर लागू आहे. तरीही चीनचं सूत जवळपास २० टक्क्यांनी स्वस्त पडतंय. त्यामुळं कापड उद्योगाकडून या सुताला मागणी वाढतेय. मागीलवर्षी चीनमधून ४ लाख १५ हजार किलो सुताची आयात झाली होती. मात्र यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये ४ लाख ६७ हजार किलो सूत चीनमधून भारतात आलं. ही आयात अशीच सुरु राहील्यास देशातील सुताचेही दर कमी होतील. परिणामी कापसाचेही दर पडतील, असा अंदाज व्यक्त होतोय.

कापूस बाजाराला भीती का?
यंदा देशात कापसाची लागवड जवळपास साडेसात टक्क्यांनी वाढली आहे. त्यातच पिकाची स्थिती चांगली असल्याचं सांगत उत्पादन वाढेल असं सांगितलं जातयं. त्यामुळं बाजारात कापूस दर दबावात येत आहेत. कापसाचे दर देशातील अनेक भागांमध्ये मागील आठवडाभरात क्विंटलमागं एक हजार रुपयाने नरमले आहेत. त्यातच चीनमधून वाढत्या सूत आयातीचाही दबाव बाजारावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळं सरकारनं चीनमधून होणारी सूत आयात थांबवावी अशी मागणी पुढे येत आहे.

चीनमधून होणारी सूत आयात देशातील उद्योगासाठी धोकादायक आहे. या स्वस्त सुतामुळं आम्हालाही सुताचे दर कमी करावे लागतात. त्यामुळं कापसाचे दरही कमी होऊ शकतात. सरकारनं चीनमधून होणारी सूत आयात थांबवली पाहीजे.
-  लक्ष्मीकांत भट्टड, कापड उद्योजक, इचलकरंजी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Varieties: एल निनोच्या परिस्थितीशी सामना करु शकणारे मक्याचे वाण

Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

Yeola Rain Damage: येवल्यात वादळी वाऱ्यासह पावसाने दाणादाण

Nashik Onion Farmer Crisis: कांद्याला कवडीमोल भाव, नाशिकमधील शेतकऱ्याचा बळी घेतला, राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया

Illegal Tree Cutting: सातारा- लोणंद मार्गावर बेकायदा वृक्षतोड अन् वाहतूक

SCROLL FOR NEXT