बाजार विश्लेषण

रावेर बाजार समितीत केळीचे भाव तेजीत

क्विंटलला १८०० रुपये दर; उत्तर भारतात मागणी कायम

टीम ॲग्रोवन

रावेर, जि. जळगाव ः जिल्ह्यातून केळीचा अतिशय तोकडा पुरवठा (Banana Supply) आणि उत्तर भारतातील केळीची (Banana Demand) कायम असलेली मागणी पाहता, येथील बाजार समितीने शुक्रवारी (ता. १७) केळीला १८०० रुपये क्विंटलचा भाव (Banana Rate) जाहीर केला. बाजार समितीने जाहीर केलेला हा गेल्या दहा वर्षांतील सर्वोच्च भाव आहे. यापुढील काळातही केळीचे भाव असेच तेजीत राहण्याची शक्यता आहे.

येथील बाजार समितीने १५ जूनला केळीला जाहीर केलेला भाव १ हजार ६७० रुपये क्विंटल होता. १६ जूनला तो ५० रुपयांनी वाढून १ हजार ७२० रुपये झाला. १७ जूनला त्यात आणखी ३० रुपयांची वाढ झाली. पुन्हा ५० रुपये क्विंटलने वाढ होऊन तो १ हजार ८०० रुपये क्विंटल इतका झाला. याबाबत बाजार समितीच्या केळी भाव समितीचे अध्यक्ष रामदास पाटील (निंबोल) यांनी सांगितले, की जिल्ह्यातूनच केळीची कापणी अगदी मर्यादित आहे. तुलनेने उत्तर भारतात अजूनही केळीची मागणी कायम आहे. त्यामुळे केळीच्या भावात ही तेजी आता राहणार आहे. व्यापारी उत्कृष्ट केळीला रावेर, यावल तालुक्यांत २ हजार १०० रुपये किंवा त्याहून जास्त भाव देत आहेत.

किसान रॅकची मागणी

रेल्वे प्रशासनाने उन्हाळा सुरू झाल्यापासून केळी वाहतुकीसाठीचा सवलतीच्या दरातील किसान रॅक कोळसा वाहतुकीच्या नावाखाली बंद केला होता व केळीची वाहतूक सवलतीच्या दरात करणे बंद केले होते. त्यामुळे रावेर आणि सावदा रेल्वे स्थानकातून आता दुप्पट भाडे देऊन केळी दिल्लीला पाठवणे खूपच कमी झाले आहे. खासदार रक्षा खडसे यांनी या प्रकरणी लक्ष घालून किसान रॅक सवलतीच्या दरात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मिळवून दिल्यास, मिळणाऱ्या वाढीव भावाचा फायदा शेतकऱ्यांना होईल. दरम्यान, बाजारपेठेची परिस्थिती पाहता, आगामी आणखीन काही दिवस केळीचे भाव तेजीतच राहतील, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT