Tur Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन

Tur Procurement : शेतकऱ्यांनी तुरीचा ऑनलाइन पीकपेरा नोंदणी असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ साठी हमीभावाने तूर खरेदीसाठी २४ जानेवारीपासून ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी पणन महासंघाचे एकूण २१ खरेदी केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत.

या केंद्रावर तूर खरेदी १३ फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांनी तुरीचा ऑनलाइन पीकपेरा नोंदणी असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात एनसीसीएफच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या वतीने (पणन महासंघ) नांदेड जिल्ह्यातील २१ खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात येणार आहे. या ठिकाणी तूर खरेदीसाठी २४ जानेवारीपासून ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. या केंद्रावर तूर खरेदी १३ फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे.

जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीचा ऑनलाइन पीकपेरा नोंदणी असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पणन महासंघाच्या वतीने हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, मुखेड तालुका खरेदी विक्री संघ मुखेड, लोहा तालुका खरेदी विक्री संघ लोहा, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट, बिलोली तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाळ उपाध्याय अभिनव सहकारी संस्था देगलूर (ता.देगलूर), मृष्णेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड धनंज (ता. मुखेड), सिद्राम फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड बेटमोगरा (ता. मुखेड), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सहकारी संस्था गणेशपूर (ता. किनवट), तिरुपती शहापूर फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड वन्नाळी (ता. देगलूर), राधाबाई फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड रातोळी (ता. नायगाव),

अष्टविनायक शेती माल खरेदी विक्री सहकारी संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव), श्री जगदंब फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड जांब बुद्रुक (ता. मुखेड), नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संस्था नांदेड (ता. अर्धापूर), कुंडलवाडी विविध सहकारी सेवा सहकारी सोसायटी कुंडलवाडी (ता. बिलोली), बळिराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्था मुखेड बेरळी खुर्द (ता. मुखेड), मुखेड फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था उमरदरी (ता. मुखेड),

जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी-विक्री सहकारी संस्था कवठा (ता. कधार), नांदेड प्रगती ॲग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड चेनापूर (ता. धर्माबाद), स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था मर्यादित शेळगाव थडी (ता. धर्माबाद), नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संस्था नांदेड (केंद्र अर्धापूर) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनकडून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती पणन अधिकारी राजेश हेमके यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT