Jowar Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maldandi Jowar : बारामतीत मालदांडी ज्वारीला क्विंटलला ४८०१ रुपयांचा दर

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.३) बारामती मुख्य यार्डमध्ये ज्वारीची ५०० क्विंटल आवक होऊन ज्वारीला प्रतिक्विंटल ४८०१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला.

टीम ॲग्रोवन

पुणे : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Baramati APMC) गुरुवारी (ता.३) बारामती मुख्य यार्डमध्ये ज्वारीची ५०० क्विंटल आवक (Jowar Arrival) होऊन ज्वारीला प्रतिक्विंटल ४८०१ रुपये (Jowar Rate) असा उच्चांकी दर मिळाला. तर चांगल्या दर्जाच्या गव्हाला ३३०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजारातील सूत्रांनी दिली.

बारामती बाजार आवारात मक्याची उच्चांकी आवक होऊन चांगल्या मक्याला प्रतिक्विंटल २२०० रुपये दर निघाला. तसेच बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल या शेतीमालाची आवक होऊन बाजरीला प्रतिक्विंटल ३५६१ आणि सोयाबीनची ११६० क्विंटल आवक होऊन ५३१७, तर सूर्यफुलाची ७६० क्विंटल आवक होऊन ७००० रुपये दर मिळाला.

खरेदीदार म्हणून आवारातील अमोल वाडीकर, बाळासो फराटे, महावीर वडुजकर, नीलेश भिंगे, प्रताप सातव, दीपक मचाले, अशोक भळगट, सतीश गावडे, मिलिंद सालपे, शिवाजी फाळके, सिद्धार्थ गुगळे, संभाजी किर्वे, कल्पेश सोनवणे, यश संघवी यांनी सहभाग घेतला.

‘‘शेतीमाल आल्यानंतर प्रथम वजननंतर लिलाव आणि लगेच पेमेंट शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळे बारामतीतील बाजारपेठेत शेतीमाल विक्रीस आणण्यास शेतकरी उत्सुकता दाखवतात. चालू वर्षी बारामती व आसपासच्या तालुक्यांत पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने सर्वच शेतमालाच्या आवकेत वाढ झाली आहे.

यापुढे शेतकऱ्यांनी पिकांचे व्यवस्थित नियोजन करून सुधारित वाणांचा वापर करावा व जादा उत्पादन काढावे. शेतीत उत्पादित झालेला शेतमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून विक्रीस आणल्यास चांगला दर मिळेल. शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल,’’ असे प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी सांगितले.

बाजार आवारात शेतीमालास चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून आणल्यास आणखी चांगला दर मिळेल, असा विश्‍वास आहे.
अरविंद जगताप, सचिव, बारामती बाजार समिती, बारामती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT Farmer Schemes: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणार कमी कागदपत्रे ! डीबीटी पोर्टलवरील २१ योजनांचे डिजिटल सुसूत्रीकरण

Marigold Price: दसऱ्यात झेंडूचा रंग पडला फिका; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा!

Maharashtra Rain Prediction: दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत १५ जागा बिनविरोध, ६ जागांसाठी १३ जण रिंगणात, पडळकर विरुद्ध पवार लढत

Market Committee Rule: बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांच्या चढ-उतारावर बंदी; माथाडी कामगारांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT