Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : दिल्ली येथे केळीची रेल्वेद्वारे अल्प वाहतूक

Banana Export : भाडेवाढ व इतर समस्यांमुळे दिल्ली येथे रेल्वेने केळीची वाहतूक अल्प किंवा अधूनमधून केली जात आहे. मध्यंतरी किंवा २०२१ पूर्वी आठ वर्षे रेल्वेने केळीची वाहतूक ठप्प होती.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : भाडेवाढ व इतर समस्यांमुळे दिल्ली येथे रेल्वेने केळीची वाहतूक अल्प किंवा अधूनमधून केली जात आहे. मध्यंतरी किंवा २०२१ पूर्वी आठ वर्षे रेल्वेने केळीची वाहतूक ठप्प होती. एप्रिल २०२१ मध्ये बंद असलेली रेल्वेने केळीची पाठवणूक सुरू झाली होती.

त्या वेळेस रावेर (जि. जळगाव) येथील मालधक्क्यावरून १८ डब्यांतून सुमारे १६२ टन केळीची पाठवणूक दिल्ली येथील आझादपूर बाजारासाठी करण्यात आली होती. नंतर पुन्हा ही वाहतूक फारशी झाली नाही. यंदा मे व जूनमध्ये खरेदीदार, शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा ही वाहतूक झाली.

पूर्वी रेल्वेने केळी वाहतुकीमुळे केळीचे दर टिकून राहायचे. केळीची खरेदी वेगात व्हायची. पण ही वाहतूक भाडेवाढ, रेल्वेचे डॅमरेज (दंड) व इतर नियम आदी कारणांमुळे बंद पडली. ट्रकद्वारे केळीची वाहतूक पंजाब, काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे केली जाते. त्यासाठी अधिकचे वाहतूक भाडे खरेदीदारांना द्यावे लागाते.

यामुळे केळी उत्पादकांना कमी दर मिळतात. किसान रेल्वे या केंद्र सरकारच्या उपक्रमातून दर आठवड्याला दोनदा रेल्वेचे आधुनिक प्रकारचे डबे (व्हीपीयू वॅगन) केळी पाठवणुकीसाठी रावेर अन्य भागांत रास्त भाडेदरात उपलब्ध करण्याची मागणी सतत केली जात आहे.

रेल्वेने केळी वाहतूक सुरू होण्यासाठी रावेर फळबागायतदार संघाने सतत प्रयत्न केले आहे. या रेल्वेने एकाच वेळी १८ डबे उपलब्ध होऊ शकतात. यातून १६२ टन केळीची पाठवणूक करता येते. एका डब्यात नऊ टन केळी भरण्यात येते. एका डब्यासाठी २०२१ मध्ये १५ हजार ३०० रुपये एवढे भाडे आकारले होते.

ट्रकने वाहतुकीच्या तुलवेत हे भाडे दर कमी असते. याचा लाभ व्यापारी, खरेदीदार व पर्यायाने केली उत्पादकांना अधिकचा होऊ शकतो. यामुळे रेल्वेने केळी वाहतुकीसंबंधी दिल्ली, पंजाबमधील मोठ्या खरेदीदारांसह जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन, शेतकरी, शेतकरी संघ, केळी उत्पादक यांच्यासह यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव, चोपडा आदी भागांतील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची मागणीदेखील केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT