Lemon Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Lemon Rate : लिंबाचे दर दबावात

Lemon Market : लिंबाचे दर दबावात असून सध्या लिंबाला ५००० ते ६००० रुपयांचा दर मिळत आहे.

Team Agrowon

Nagpur News : महिनाभरापूर्वी बाजारात लिंबू दर दहा हजार रुपयांवर होते. तापमानात झालेली वाढ आणि त्या तुलनेत अधिक असलेली मागणी आणि पुरवठा कमी यामुळे दरात तेजी आली होती. आता मात्र लिंबाचे दर दबावात असून सध्या लिंबाला ५००० ते ६००० रुपयांचा दर मिळत आहे.

नागपूरच्या कळमना बाजारात अमरावतीसह नागपूरलगतच्या काही भागांतून लिंबू आवक होते. गेल्या हंगामात मॉन्सूनोत्तर तसेच अवकाळी पावसाचा फटका बहराला बसला. त्याच्या परिणामी लिंबाचा हंगाम कालावधी वाढला. त्यामुळेच सुरुवातीला दहा क्‍विंटल इतकी अत्यल्प आवक असताना दर देखील चांगलेच तेजीत आले होते.

सरासरी ७००० ते १० हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर लिंबाला मिळत होता. त्यानंतर मात्र सध्या दर दबावात आले आहेत. सध्या कळमना बाजारात लिंबाची आवक ५० क्‍विंटल इतकी असून याला ५००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. गेल्या आठवड्यात लिंबाचे दर ६००० ते ७००० रुपयांवर होते. २० ते ५० क्‍विंटल अशी आवक होत असल्याचे सांगण्यात आले. सध्या बहुतांश भागात ढगाळ वातारण, गारपीट होत असल्याने लिंबाच्या मागणीत हलकी घट झाली आहे.

अमरावतीत दर ५००० रुपयांवर

अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्‍वर परिसरात लिंबू बागा आहेत. त्यामुळेच या भागाला लिंबू उत्पादनाचे हबही म्हटले जाते. या भागात उत्पादित लिंबू देशभरातील बाजारपेठेत जातात. गेल्या महिन्यात अमरावती बाजारात देखील लिंबाचे दर १० हजार रुपयांवर होते. आता मात्र वातावरणातील बदलाच्या परिणामी मागणीत घट झाल्याने सध्या दहा क्‍विंटलपर्यंत आवक होणाऱ्या लिंबाला ४००० ते ५००० रुपयांचा दर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडल्याने शेतकरी संतप्त, 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना विचारला जाब

Hailstorm Damage: गारपीट-अवकाळीमध्ये ऊस पिकाची काळजी कशी घ्यावी?

District Collector Award: ई-गव्हर्नन्सबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

Unseasonal Rain: 'अवकाळी'सह गारपिटीचा तडाखा सुरुच, पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला झोडपले, कांदा, गहू पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत

Sangli District Bank: सांगली जिल्हा बँक राज्यात अग्रेसर बनविणार

SCROLL FOR NEXT