Sugar  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar : जुलैची देशांतर्गत साखर विक्रीस एक महिन्याची मुदतवाढ

जुलै महिन्यातील देशांतर्गत साखर विक्रीसाठी एक महिन्याची मुदतवाढ (३० दिवस) अन्न सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : जुलै महिन्यातील देशांतर्गत साखर विक्रीसाठी (Domestic Sugar Sale) एक महिन्याची मुदतवाढ (३० दिवस) अन्न सार्वजनिक वितरण विभागाने (Food And Public Distribution) दिली आहे. मंगळवारी (ता. २) याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

वाहतुकीची अपुरी उपलब्धता आणि अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये साखर वाहतूक करणे अडचणीचे झाले आहे. सर्वच घटकांना ही समस्या भेडसावत असून यातून वर काढण्यासाठी केंद्राने जिल्ह्याची साखर विक्रीसाठी एक महिना परवानगी दिली.

कारखानदारांना ऑगस्टअखेर जुलै व ऑगस्टची साखर विकता येणार आहे. जुलैच्या सुरुवातीला केंद्राने २१ लाख टन साखर विक्रीचा कोटा दिला होता. काही दिवसांनंतर त्यात पुन्हा ४४ हजार टनांची वाढ गेली होती. देशात बहुतांश ठिकाणी जुलैमध्ये पाऊस असल्याने साखरेचे वाहतूक व विक्री करणे कठीण गेले याची दखल घेऊन केंद्राने ही सवलत दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT