Jowar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jowar Price: अहिल्यानगर बाजारात ज्वारीला ३६०० ते ४१०० रुपये दर

Jowar Production: अहिल्यानगरच्या बाजारात सध्या ज्वारीला ३६०० ते ४१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, सरासरी ३८५० रुपयांचा दर आहे. मात्र, आवक कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

मनोज कापडे

Ahilyanagar News: अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत अजूनही ज्वारीची फारशी आवक होताना दिसत नाही. सध्या ज्वारीला प्रति क्विंटल ३६०० ते ४१०० आणि सरासरी ३८५० रुपयांचा दर मिळत आहे. ज्वारीला मागणी असून अपेक्षित दर मिळत नसल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत यंदा ज्वारीचे उत्पादन घेतले जात आहे. ज्वारीचे उत्पादन घेताना काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान नाही. ज्वारीची कामे करणारे मजूर मिळत नसल्याने ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात ज्वारीचे प्रमुख पीक होते, मात्र यंदा सरासरीच्या पन्नास टक्केच पेरणी झाली आहे. अहिल्यानगरच्या बाजारात सोलापूर, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातून ज्वारी विक्रीसाठी येते, सध्या ज्वारीच्या काढण्या आवरल्या असल्या तरी मात्र अजूनही ज्वारीची फारशी आवक होताना दिसत नाही.

सध्या चांगल्या दर्जाच्या ज्वारीला दररोज २०० क्विंटलपर्यंत ज्वारीची आवक होत असून ३६०० ते ४१०० व सरासरी ३८५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. १५ मार्चला १६० क्विंटलची आवक होऊन ३५०० ते ४ हजार व सरासरी ३७५० रुपये दर मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

SCROLL FOR NEXT