Jaggery Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : गूळ दरात २०० रुपयांनी वाढ

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : येथील बाजार समितीत चार दिवसांत गुळाच्या दरात क्विंटलला सरासरी २०० रुपयांनी वाढ झाली. जिल्ह्यात गूळ उत्पादक तालुक्यांत परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. यामुळे गूळ उत्पादनात काहीशी घट झाली. उत्पादन कमी होत असले तरी व्यापाऱ्यांकडून मागणी कायम असल्‍याने गुळाच्या दरात वाढ होत असल्‍याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

बाजार समितीत गुळाचा मुख्‍य हंगाम साधारणतः दसऱ्यानंतर सुरू होतो. परतीच्या पावसाच्या स्वरूपावर गुऱ्‍हाळ मालक गुऱ्हाळ सुरू करतात. साधारणपणे कारखान्यांचा हंगाम सुरू होण्याअगोदर काही दिवस अगोदर गूळ उत्‍पादनास सुरुवात होते. अनेक गुऱ्हाळघरे ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न असतो.

यंदा पावसाचे प्रमाण कमी-अधिक आहे, यामुळे गुऱ्हाळघरे अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. सध्या पितृपंधरवडा असल्यानेही अनेक गुऱ्हाळघरे सुरू करण्यास गुऱ्हाळ मालकांनी पसंती दाखविली नाही. गुजरातमधील व्यापारी कोल्हापूरबरोबर कर्नाटकातील गुळाची खरेदी करतात, पण गेल्‍या काही दिवसांपासून कर्नाटकातील गुऱ्हाळे बंद झाली आहेत.

यामुळे कर्नाटकातील गूळ उत्पादनही रोडावले आहे. यामुळे व्‍यापाऱ्यांनी कोल्हापूरच्‍या गुळास पसंती दिली आहे. परिणामी गुळाच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. घटस्थापनेला मुहूर्त करून गुऱ्हाळघरे गुळ उत्पादनास प्रारंभ करतील. दसऱ्याच्या दरम्यान गुळाची आवक वाढेल, अशी माहिती गूळ बाजारातून देण्यात आली.

शीतगृहातील गूळ संपला

गुजरातमधील शीतगृहात साठवलेला गूळ एक महिन्यापूर्वीच संपला आहे. सध्या तेथील व्यापारी मागणी इतका गूळच खरेदी करत आहेत. जितका गूळ उत्पादित होईल तितक्‍या गुळाची दररोज खरेदी सुरू आहे.

शीतगृहातील गुळाची खरेदी नोव्हेंबर ते डिसेंबरला सुरू होण्याची शक्यता आहे. सध्‍या उसाची वाढ आणि कमी उत्पादकतेचा अंदाज पहाता यंदाच्या मुख्य हंगामात गुळाचे दर टिकून राहतील, असा अंदाज गूळ उद्योगातील तज्ज्ञांचा आहे.

गूळ दराची स्थिती (प्रतिक्विंटल, दर रुपयांत)

गूळ दर्जा दर (किमान कमाल) सरासरी

१ ४६००- ४६०० ४६००

२ ४१००- ४३०० ४२००

३ ३८००- ४०९० ४०००

४ ३४००- ३७९० ३७००

गेल्या काही दिवसांपासून गुळाची आवक कमी झाल्याने गुळाच्या दरात वाढ आहे. गुळाची आवक दसऱ्यानंतर वाढू शकते. तोपर्यंत दर स्थिर रहातील, असा अंदाज आहे.
- के. बी. पाटील, गूळ विभागप्रमुख, कोल्हापूर बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT