Jaggery Market : गुळाच्या आवकेत घट

Jaggery Market Rate : गेल्या काही दिवसांपासून गुळाचे दर स्‍थिर आहेत. सध्या गुळास क्विंटलला ३९०० ते ४००० रुपये इतका दर मिळत आहे.
Jaggery Market
Jaggery MarketAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : गेल्या काही दिवसांपासून गुळाचे दर स्‍थिर आहेत. सध्या गुळास क्विंटलला ३९०० ते ४००० रुपये इतका दर मिळत आहे. गौरी-गणपती सणांमुळे बहुतांशी गुऱ्‍हाळे बंद असल्याने आवकेत काहीशी घट झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गुजरातमध्येही मागणीत फारशी वाढ नाही. यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या सप्ताहापर्यंत अनेक व्यापाऱ्यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर गुळाची खरेदी केली. जसे गुळाचे सौदे होतील तसा गूळ तातडीने गुजरातला पाठविण्यात येत होता. सणांमुळे गूळ खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात व्यापारी उत्सुक दिसले. साधारणतः गणेश उत्‍सव सुरू होईपर्यंत गुळाचे दर सातत्याने ४००० रुपयांवर होते.

Jaggery Market
Jaggery Market : गुळाला मागणी स्थिर; दरात काहीशी घट

विशेष म्‍हणजे आवकही चांगली होती. एक दिवसाआड सहा ते सात हजार गूळ रव्यांची विक्री होत होती. सण सुरू झाल्‍यानंतर मात्र अनेक ठिकाणी गुऱ्हाळे बंद झाली. मनुष्यबळाअभावी अनेक ठिकाणी गूळ निर्मितीस अडथळे येत असल्याने गुळाच्या आवकेवरही याचा विपरीत परिणाम झाला.

गणेशोत्‍सवास प्रारंभ झाल्यापासून गुळाची आवकही कमी होत गेली. व्यापाऱ्यांनीही सणांसाठी अगोदरच गूळ घेऊन ठेवल्याने सध्‍या फार गतीने गुळाची खरेदी होत नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

जरी खरेदी कमी होत असली तरी गुळाचे दर ४००० रुपयांच्या आसपासच आहेत. अद्यापही एक दिवसाआड सौदे सुरू आहेत. तसेच येणाऱ्या गुळाचीही विक्री होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गुळाच्या किमती कमी होत नसल्याचे चित्र आहे.

Jaggery Market
Jaggery Houses Kolhapur : कोल्हापुरातील गुऱ्हाळ घरे झाली सुरू, गुळालाही मिळतोय उच्चांकी दर

गुजरातमध्ये व्यापाऱ्यांनी प्राधान्याने शीतगृहातील गुळाची विक्री केली आहे. सध्‍या तेथील शीतगृहात फारसा गूळ नाही. बहुतांशी व्‍यापारी गुळाची साठवणूक नोव्हेंबर मध्ये करतात. या कालावधीत येणाऱ्या गुळाचा दर्जा चांगला असल्याने व्यापारी नोव्हेंबरच्‍या गुळाला पसंती देतात. सध्‍या जो गूळ खरेदी केला जात आहे. त्याची विक्रीही तातडीने होत असल्याने गूळ शिल्लक राहत नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

येत्या पंधरा दिवसांत नवीन गुऱ्हाळे सुरू होण्याची शक्यता कमी आहे. नवीन हंगामाचा प्रारंभ दसऱ्यानंतरच होण्याची शक्यता असल्याने, अजून पंधरा दिवस ते तीन आठवड्यापर्यंत गुळाची आवक अपवाद वगळता सध्या आहे तितकीच राहील, अशी माहिती गूळ विभागातून देण्यात आली.

कोल्हापूर बाजार समितीतील दर असे (क्‍विंटल, रुपयांत) ः

गूळ दर्जा---किमान कमाल---सरासरी

२---४२८०-४२८०---४२८०

३---३९००-४२००---३९००

४---३६७५-३८८०---३७००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com