Apple  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Iran Apple : इराणचे सफरचंद बाजारामध्ये दाखल

Apple Rate : लाल, एकसारखा आकार, टिकाऊ आणि चवीला गोड अशा इराणच्या सफरचंदाला चांगली मागणी वाढली आहे.

Team Agrowon

Pune News : हवामान बदलांचा फटका बसल्याने यंदा काश्मीर, हिमाचल प्रदेशच्या सफरचंदाचा हंगाम लवकर आटोपला. त्यामुळे बाजारपेठेतील सफरचंदाची मागणी लक्षात घेता, आयातदारांनी इराण आणि तुर्की येथील सफरचंद आयात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता इराणच्या सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे.

लाल, एकसारखा आकार, टिकाऊ आणि चवीला गोड अशा इराणच्या सफरचंदाला चांगली मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात या सफरचंदाला किलोस १५० ते १७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आरोग्यासाठी सफरचंदाला वर्षभर मागणी असते. यंदा मात्र स्थानिक हिमाचल आणि काश्मीरचा हंगाम लवकर संपल्याने आयात सफरचंदाला मागणी वाढली आहे.

पुणे बाजार समितीमध्ये गरजेनुसार तुर्की, इराण, इटली, न्यूझिलंड, बेल्जियम, वॉशिंग्टन, चिली, पोलंड, स्पेन आदी देशांतून सफरचंदाची आवक होत असते. बाजारात सध्या इराण सफरचंदाचा हंगाम सुरू असून हा हंगाम नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत असतो. तर, तुर्की सफरचंदाचा हंगाम जानेवारी ते एप्रिल दरम्यान असतो.

इराणच्या सफरचंदांची आवक चांगली वाढली असून, बाजारात दररोज इराणहून ५ ते ६ हजार क्रेट इतकी सफरचंदाची आवक होत आहे. घाऊक बाजारात दहा किलोच्या इराण सफरचंदाच्या क्रेटला ११०० ते १२०० रुपये भाव मिळत आहे. तुर्की सफरचंदाला १८ किलोच्या पेटीस २८०० ते ३२०० रुपये भाव मिळत आहे, अशी माहिती सफरचंदाचे आयातदार आणि आडते शिवजीत झेंडे यांनी दिली.

काश्मीर, हिमाचलच्या उत्पादनात घट

गेल्यावर्षी बर्फवृष्टी कमी झाल्याने काश्मीर, हिमाचल सफरचंदाचे उत्पादन निम्म्याने कमी झाले आहे. उत्पादन घटल्याने उत्तरेकडील राज्यात सफरचंदाची विक्री जास्त झाली. त्यामुळे यंदा पुण्याच्या बाजारपेठेत पन्नास टक्क्यांनी आवक कमी झाली. त्यातही फळाचा दर्जा फारसा चांगला नव्हता. त्यामुळे यंदा इराण सफरचंदाला मागणी असल्याचे आडते सुयोग झेंडे यांनी सांगितले.

इराणमधील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात सफरचंद उत्पादन होते. ऊर्मिया, वेस्ट अझरबैजान, ईस्ट अझरबैजान, मरागे, मियाने, इसफान, सेमिरॉन या जिल्ह्यांतून सफरचंदाची आवक होत आहे. सुमारे आठ दिवसांच्या प्रवासानंतर हिंदुस्थानात सफरचंद दाखल होत आहे. इराणमध्ये सफरचंदावर प्रक्रिया आणि केमिकल वापराचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे या सफरचंदाचा रंग, दर्जा आणि गोडी चांगली आहे.
- शिवजीत झेंडे, आयातदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement: मका, ज्वारीची १ मेपासून हमीभावाने खरेदी

Tree Plantation: १९ हेक्टरवर ५७ लाख रोपणास ३.६९ कोटी होणार खर्च

Fertilizer Supply: परभणी जिल्ह्यात खरिपासाठी एक लाख ६१ हजार टन खतांचा पुरवठा

Tribal Economy: मोहाच्या फुलांमुळे स्थानिक अर्थकारणाला बळ

Drought Management Committee: जिल्हास्तरीय ‘दुष्काळ व्यवस्थापन समिती’ची नव्याने रचना

SCROLL FOR NEXT