Aslam Abdul Shanedivan
आपले आहारतज्ज्ञ डॉक्टर आणि घरातील वडीलधारी मानसं रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात.
सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला ताकद देतात
रोज नाश्त्यात एक सफरचंद खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्याबरोबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
यातील फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी खूप फायदेशीर असून कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतात
सफरचंदांमध्ये विरघळणारे फायबर (पेक्टिन) आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका होण्यास मदत मिळते
सफरचंदांमध्ये कमी कॅलरी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे भूक दीर्घकाळ लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते
सफरचंदात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे देखील त्वचेचे आरोग्य सुधारतात.